भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी अनेक प्रकारच्या जाहिराती केलेल्या आहेत. यामध्ये अशी एक गोष्ट समोर आली आहे जी ऐकल्यावर धक्काच बसेल. ते म्हणजे भारतीय संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान कधीही दारूची जाहिरात केली नाही. या गोष्टीचा खुलासा सचिन तेंडुलकर यांनी स्वत: केला आहे.
सचिन तेंडुलकर यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना सांगितले की, दारुची जाहीरात न करण्यामागे त्यांनी त्यांच्या वडीलांना दिलेले वचन हे कारण होते.
सचिन तेंडुलकर यांनी सांगितले की, “मी वडिलांना वचन दिले होते की मी कधीच तंबाखू किंवा दारूची जाहिरात करणार नाही.” सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले की, “माझ्या वडिलांनी सांगितले की तू सर्वांसाठी आदर्श आहेस. खूप लोक असे आहेत जे तुझे अनुकरण करतील. याच कारणामुळे मी आजपर्यंत कधीच तंबाखू आणि दारूची कधीच जाहिरात केली नाही.”
सचिन तेंडुलकर यांनी सांगितले की, “1990 दशकांमध्ये माझ्या बॅटवर कोणत्याही कंपनीचे स्टिकर नव्हते. मी कोणत्याही कंपनीशी करार केला नव्हता. त्यावेळीही मी माझ्या वडिलांना दिलेले वचन मोडले नाही.” सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले की “मला ब्रँडच्या स्टीकर लावण्यासाठी खूप प्रस्ताव आले परंतु मी त्यांना नकार दिला. तंबाखू आणि दारू या दोन उत्पादनापासून मी लांब राहिलो आणि माझ्या वडिलांना दिलेल्या वचनही मी पाळले.”
सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा ‘देव’ मानले जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये 15,921 तर कसोटी सामन्यांमध्ये 18,426 धावा बनविल्या. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत शतकांचे शतक करण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर यांच्या नावाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या द्विशतकाची नोंद आहे. 24 फेब्रुवारी 2010 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक
श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश झाला ‘हा’ खेळाडू, शेअर केली भावनिक पोस्ट
जमलंय ना! श्रीलंका दौऱ्यात ‘या’ गोष्टी भारतीय संघासाठी ठरु शकतात फायदेशीर