Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चहावाल्याचं भाग्य उजळलं! स्वतः सचिन तेंडुलकरने थांबवली गाडी, अर्जुनही होता सोबत

चहावाल्याचं भाग्य उजळलं! स्वतः सचिन तेंडुलकरने थांबवली गाडी, अर्जुनही होता सोबत

November 4, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
sachin tendulkar

Photo Courtesy: Instagram/screegrabs


सचिन तेंडुलकर याला भारतीय संघाचा सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू मानले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली असली, तरी सचिनच्या चाहत्यांमध्ये मात्र जराही कमी झाल्याचे दिसत नाही. असे असले तरी, याच चाहत्यांमुळे भारतीय संघाच्या अशा दिग्गजांना सार्वजनिक ठिकाणी जाणे मात्र अनेकदा टाळावे लागते.  सिचनवर देखील नेहमीच या कारणामुळे मन मारण्याचे वेळ आलीच असानी. परंतु बेळगाव गोवा महामार्गावर मात्र त्याने रस्त्याच्या बाजूला गाडी लावून चहाचा आनंद घेतला.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वात मोठा खेळाडू मानले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा एकमेव फलंदाज देखील सचिनच आहे. सचिन भारततीय संघाचा एवढा मोठा खेळाडू असला, तरी अनेकदा साध्या वागणुकीमुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत असते. त्याचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. यावेळी त्याने रस्त्याच्या बाजूला थांबून चहाचा आनंद घेतला. यावेळी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सोबत होता.

View this post on Instagram

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

सचिनने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा फोटो शेअर केला आहे. सचिन टी शर्ट आणि ट्राउजरवर दिसत आहे. सचिन गाडीतील खाली उतरून पिण्यासाठी चहा आणि त्याच्यासोबत टोस्ट देखील घेतो. यावेळी अर्जुन मात्र गाडीतूनच वडिलांकडे पाहत आहे. सचिनने त्याला चहा पिण्यासाठी खाली देखील बोलवल्याचे व्हिडिओत पाहिले जाऊ शकते. चाहत्यांकडून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सिचनने लिहिले की, “रोड ट्रीपवर चहासाठी थांबलेच पाहिजे.”

चाहत्यांनी सचिनचा हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिन काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड लीगमध्ये खेळताना दिसला आहे. काहींनी सचिन या लीगमध्ये केळल्यामुळे देखील त्याचे आभार मानले आहे. एका चाहत्याने लिहिले की, “निवृत्तीनंतर देखील जगाचे मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद. मी तुला मैदानात पाहण्यासाठी लिजेंड्स लीग 2023 वाट पाहू शकत नाहीयेय.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनल आणि फायनलसाठी आयसीसीने बदलले नियम; पाऊस आला तर असा ठरणार विजेता
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन  


Next Post
Gerard Piqué

बार्सिलोनाच्या जेरार्ड पिकेची अचानक निवृत्तीची घोषणा; दिला 14 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम

MS-Dhoni-And-Shardul-Thakur

शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने 'माही'वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल

Rashid Khan

चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध राशिद खानचा कहर, टी20 विश्वचषकातील 'हा' बलाढ्य रेकॉर्ड केला नावावर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143