भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीबीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जवळपास निश्चित आहे. याची अधिकृत घोषणा २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
याचेच औचित्य साधून अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी गांगुलीचे अभिनंदन केले. त्यात लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.
परंतु रविवारी रात्री निवड झाली परंतू एका महान खेळाडूने गांगुलीचे अभिनंदन केले नव्हते तो अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर.
सचिनने आज मात्र ट्विटरच्या माध्यमातून आपल्या एकेकाळच्या कर्णधाराचे अभिनंदन केले आहे.
“दादी, तुझी भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप अभिनंदन. मला खात्री आहे की तु जशी आजपर्यंत या संघाची सेवा केलीस तशीच यापुढेही करशील. याचबरोबर ज्यांची यात निवड झाली आहे त्यांचे सर्वांचेच मनापासून अभिनंदन. ” असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सचिन सौरव गांगुलीला प्रेमाने दादी म्हणतो. या दोनही महान खेळाडूंनी तब्बल ३४१ आंतरराष्ट्रीय सामने सामने एकत्र खेळले आहेत.