भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत असतो. जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस डे साजरा केला जातो. जगभारत यादिवशी आनंदाचे वातावरण असते आणि सर्वजण हा सन साजरा करत असतात. असे असले तरी, ख्रिसमस डेच्या एक दिवस आधीच सचिन तेंडुलकरने हा सन साजरा केला आहे. त्याने शनिवारी (24 डिसेंबर) लहान मुलांना काही भेटवस्तू दिल्या आणि ख्रिसमस डे साजरा केला.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हॅप्पी फीट होम फाउंडेशन (Happy Feet Home Foundation) संस्थेशी जोडल्या गेलेल्या मुलांसोबत एक दिवस आधीच ख्रिसमस डे साजरा केला आहे. मास्टर ब्लास्टरने या भेटीदरम्यान सर्व मुलांसाठी खास भेटवस्तून नेल्या होत्या. भेटवस्तू मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या मुलांसाठी सचिनला अचानक भेटण्याची संधी मिळणे ही खूपच मोटी गोष्टी होती. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ही गोष्ट स्पष्टपणे दिसून आली.
सचिनने मुलांसोबत घेलवला वेळ
सचिनने इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सचिनने शनिवारी दिलेली भेट त्याच्यासाठी देखील खास ठरली. यादरम्यान, त्याने मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम देखील खेळला. त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मुलांना भेटून आलेला आनुभव शेअर केला आहे. सचिनने या मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, त्यांच्या सुट्ट्यांसाठी कार्यक्रम आणि रुग्णालयांसाठी देखील योगदान दिले आहे.
https://www.instagram.com/reel/CmjFjpjg0QR/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, हॅप्पी फीट होम फाउंडेशन सियोन हॉस्पिटलच्या साधीने मागच्या काही वर्षांपासून काम करत आहे. हे फाउंडेशन लहान मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे. सचिन तेंडुलकरच्या या योगदानामुळे 400 मुलांना त्याचा फायदा मिळणार आहे. सचिनने यावेळी लहान मुलांसोबत त्याच्या लहानपणीचे किस्से देखील शेअर केले. हॅप्पी फीट फाउंडेएशनची सुरुवात 2014 मध्ये झाली असून संस्था लहान मुलांची देखभाल करण्याचे काम करत आली आहे. (Sachin Tendulkar’s special gifts for children on Christmas)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम