पुणे। दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतर्फे आयोजित पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत शो जंपिंग प्रकारात रोहीत आहिर, अनिरुद्ध मोहिरे आणि सागर गामा हे आपापल्या गटात अव्वल ठरले. पुणे, पिंपरी-चिंचवड येथून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंड येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेतून यावर्षी आॅगस्टमध्ये बँगलोर येथे होणाºया इक्वेस्ट्रीअन प्रिमीअर लीग या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम, आयोजक गुणेश पुरंदरे, प्रदीप कुरुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष आहे.
शो जम्पिंगच्या ६० सेंटीमीटर स्पर्धेत रोहीत आहिर (सुवर्ण), अजिंक्य बालवडकर (रौप्य), काजल बोरसे (कांस्य), तर ८० सेंटीमीटर स्पर्धेत अनिरुद्ध मोहिरे (सुवर्ण), गौतम लेले (रौप्य), श्रेया पुरंदरे (कांस्य), १०० सेंटीमीटर स्पर्धेत सागर गामा (सुवर्ण), अनिकेत हलभावी (रौप्य), अनिरुद्ध मोहिरे (कांस्य) यांनी विजयी कामगिरी केली.
तर १६ वर्षाखालील हॅक्स स्पर्धेत अलिशा मोरे (सुवर्ण), आयेशा मोरे, ऐश्वर्या भोकरे (रौप्य), चित्रा भोकरे, सिद्धार्थ पंडीत (कांस्य) आणि १६ वर्षापुढीलगटात प्रेरणा चौधरी, पार्थ शहा (सुवर्ण), आरोही नगिने (रौप्य), प्रज्ञा दातार, चिराग नगिने (कांस्य) पदकाची कमाई केली. पोल बेंडींग स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात समृद्धी मुंगसे (सुवर्ण), चित्रा भोकरे (रौप्य), विहान काळोखे (कांस्य), आणि १६ वर्षापुढील- आरोही नगिने (सुवर्ण), पूर्वा शितोळे (रौप्य), चिराग नगिने (कांस्य) यांनी विजय मिळविला. बॉल अॅन्ड बकेट स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात वेदांत लांडगे (सुवर्ण), ऐश्वर्या भोकरे (रौप्य), रिषभ मन्नर (कांस्य), आणि १६ वर्षापुढील- सतिश पाटील (सुवर्ण), पूर्वा शितोळे (रौप्य), रोशन फाले ( कांस्य) हे अव्वल ठरले.