आयपीएल 2025 पूर्वी गुजरात टायटन्ससाठी मोठी बातमी आली आहे. संघाचा युवा फलंदाज साई सुदर्शनवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी गुजरातने साई सुदर्शनला 8.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने गुजरात संघाला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे.
साई सुदर्शनने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, काही दिवसांनी तो पुन्हा तंदुरुस्त होईल. वैद्यकीय टीमचे प्रयत्न आणि बीसीसीआयच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल टायटन्स परिवाराचे आभार. त्याचा फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्स संघाने त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. त्याच्या पहिल्या सत्रात त्याने एकूण 145 धावा केल्या. गेल्या तीन मोसमात तो चांगली कामगिरी करत असून प्रत्येक मोसमात त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. आतापर्यंत त्याने 25 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 1034 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये साई सुदर्शन खेळू शकणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, त्याने तामिळनाडूसाठी फक्त एकच सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याला त्रिपुराविरुद्ध 9 धावा करता आल्या होत्या. आतापर्यंत त्याने 28 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 1396 धावा केल्या आहेत. त्याने 28 लिस्ट-ए सामन्यांमध्ये एकूण 1396 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एकूण 13 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने भारतीय संघासाठी 3 वनडे आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
हेही वाचा-
IND vs AUS: टीम इंडियाची चिंता वाढली, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी!
मोहम्मद रिझवानचा रेकॉर्ड, टी20 क्रिकेटमध्ये दोनदा केला हा लाजिरवाणा विक्रम
मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!