लष्कराचा उदयोन्मुख खेळाडू सलमान खान आणि पुनरागमन करणारा दत्तू भोकनळ यांनी चमकदार कामगिरीसहर २४व्या खुल्या नौकानयन राष्ट्रीय स्पर्धेत सिंगल स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. सीएमईच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर सुरु असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटातहरी लष्कर आणि सेनादलाच्या खेळाडूंमध्ये चुरस होती. मात्र, सलमान आणि दत्तूने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले.
हरियणात जन्मलेल्या ६ फूट ५ इंच उंच सलमानने १ मिनिट ४०.८ सेकंद अशी वेळ देत ५०० मीटर शर्यतीतची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याच्यासमोर २०१८ रियो ऑलिम्पियन दत्तू भोकनळचे आवहान असेल. दत्तूने उपांत्य फेरीतील सर्वोत्तम वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली. दत्तीने १ मिनिट ३१.७ सेकंद अशी वेळ दिली. दत्तूने टोकियो ऑलिम्पियन अरविंद सिंगला (१ मिनिट ३२.७ सेकंद) मागे टाकले.
स्पर्धेच सत्र लांबल्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत सेनादल संघाने सिंगल स्कल्स, कॉक्सलेस फोर, डबल स्कल्स या शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डबल स्कल्स प्रकारात ऑलिम्पियन अर्जुन लाल जाट आणि अजय त्यागी यांच्या कामगिरीकडे लक्ष असले. त्यांनी १ मिनिट २९.१ सेकंद वेळ दिली. महिला विभागात केरळ, मणिपूर, हरियाणा यांनी प्रत्येकी तीन प्रकारात अंतिम पेरी गाठली.
खुल्या प्रकारात महाराष्ट्राला चांगले यश मिळाले. दत्तूने वेगवान कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. तेजश शिंदे-ओंकार म्हस्के यांनी कॉक्सलेस प्रकारात पोल पोझिशन मिळविली. या गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत पुनित कुमार-आशिष या सेनादलाच्या जोडीने १ मिनिट ३१.२ सेकंद अशी वेळ दिली.
महिला विभागात दुसऱ्या क्रमांकाने महराष्ट्राच्या दोन जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली. सिंगल स्कल्समध्ये मृण्मणी साळगांवकरने १ मिनिट ५२.७ सेकंद अशी वेळ दिली. उत्तर प्रदेशाची किरण देवी १ मिनिट ५१.५ सेकंद वेळ देत आघाडीवर राहिली. कॉक्सलेस जोडीत कोमल बोडकरे आणि भाग्यश्री चव्हाण १ मिनिट ५०.७ सेकंद वेळेसह अंतिम फेरीत दाखल झाल्या. केरळची जोडी देवप्रिया आणि अरुंदती वायजेने अव्वल क्रमांकाने अंतिम फेरी गाठली.
(Sailing National Championships Dattu Bhokanal in the final round in the comeback race)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत
इंदौर कसोटीतून राहुल बाहेर झाला तर कुणाला मिळणार संधी? ‘हे’ खेळाडू करू शकतात ओपनिंग