fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘करन ब्रदर्स’मुळे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडली इंग्लंड संघाबाबत ही खास गोष्ट

अन्य खेळाप्रमाणेच क्रिकेटमधील अनेक भावांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक भावांच्या जोड्यांनी एकत्र क्रिकेटही खेळले आहे. आता यात इंग्लंडच्या सॅम आणि टॉम करन या भावांच्या जोडीचाही समावेश झाला आहे.

हे दोन भाऊ इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारी (23 आॅक्टोबर) झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात एकत्र खेळले. इंग्लंडकडून जवळजवळ दोन दशकांनंतर भावांची जोडी एकत्र एका सामन्यात खेळताना दिसली आहे.

या दोघांनी मिळून इंग्लंडकडून 25 सामने खेळले आहेत. सॅमने इंग्लंडकडून जून 2018 मध्ये तर टॉमने जून 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

याआधी इंग्लंडकडून शेवटची फेब्रुवारी 1999 ला अॅडम आणि बेन होलीओक ही भावांची जोडी एकत्र खेळली होती. विशेष म्हणजे हे दोन भाऊही शेवटचे श्रीलंकेविरुद्धच शेवटचे एकत्र सामना खेळले होते.

अॅडमने इंग्लंड संघाचे नेतृत्वही केले आहे. परंतू वयाच्या 24 व्या वर्षी आॅस्ट्रेलियामध्ये दुर्दैवाने बेनचा कार अपघातात मृत्यू झाला.

होलीओक या भावांच्या जोडीआधी पीटर आणि डीक रिचर्डसन, हर्न भाऊ, जॉर्ज आणि चार्ल्स स्टड या भावांच्या जोड्या इंग्लंडकडून एकत्र खेळल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक

भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम

मुंबई संघाला मोठा धक्का; पृथ्वी शॉ दुखापतीने जायबंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?

You might also like