आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १० विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी चेन्नईच्या सॅम करन आणि इम्रान ताहिर या क्रिकेटपटूंनी एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात चेन्नईची फलंदाजी मुंबई इंडियन्सच्या तिखट माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकवेळ अशी आली होती की चेन्नई ५० धावांची आकडा पार करणार की नाही याबाबत साशंकता होती. पण नंतर २२ वर्षीय सॅम करनने चेन्नईचा डाव सावरायला सुरुवात केली. त्याने १० व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इम्रान ताहिरबरोबर ९ व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली.
त्यामुळे आयपीएलमध्ये ९ व्या विकेटसाठीसाठी केलेली ही सर्वोच्च धावांची भागीदारी ठरली आहे. याआधी हा विक्रम एमएस धोनी व आर अश्विन आणि ड्वेन ब्रावो व इम्रान ताहिर या दोन जोड्यांच्या नावावर होता. २०१३ ला कोलकाता येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनी आणि अश्विनने ९ व्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली होती. तसेच २०१८ ला मुंबई येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध ब्रावो आणि ताहिरने ९ व्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली होती.
करन-ताहिरच्या भागीदारीमुळे चेन्नईने गाठली सन्मानजनक धावसंख्या
शुक्रवारी झालेल्या सामन्यात करन आणि ताहिर यांनी केलेल्या ४३ धावांच्या भागीदारीमुळे एकवेळी २१ धावांत ५ विकेट्स गमावलेल्या चेन्नईने २० षटकात सन्मानजनक ११४ धावसंख्या उभारली. करनने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. तर ताहिरने नाबाद १३ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर(११) आणि एमएस धोनी(१६) यांनाच वैयक्तिक दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाज १० धावाही प्रत्येकी करु शकले नाहीत.
मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन कुल्टर-नाईलने १ विकेट घेतली.
त्यानंतर ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून इशान किशनने नाबाद ६८ आणि क्विंटॉन डिकॉकने नाबाद ४६ धावा केल्या. त्यांच्या नाबाद भागीदारीमुळे मुंबईने १३ व्या षटकातच ११५ धावांचे आव्हान गाठले आणि सामना १० विकेट्सने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्ध एकहाती सामना जिंकवून देणारा ईशान किशन म्हणतो, ‘त्या’ खेळाडूकडून नेहमीच शिकायला मिळते
‘पॉवरप्लेमध्येच खेळ संपला होता’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध जे कोणत्याच संघाला करता आले नाही ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवले
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला