पुणे। मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व सुहाना प्रायोजितएमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई लीग स्पर्धेत मुलींच्या गटात समीक्षा शेट्टी हिने तर, मुलांच्या गटात आरव शहा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित तमन्ना नायरने शनाया सिंगचा 6-0 असा तर, पाचव्या मानांकित समीक्षा शेट्टी याने चौथ्या मानांकित हर्षा देशपांडेचा 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशीने सहाव्या मानांकित रुमी गादियाचे आव्हान 6-0 असे संपुष्ठात आणले.
मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पंधराव्या मानांकित आरव शहाने चौथ्या मानांकित नीव शेठचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
निकाल: मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सृष्टी सूर्यवंशी[1] वि.वि.रुमी गादिया[6]6-0;
समीक्षा शेट्टी[5]वि.वि.हर्षा देशपांडे[4] 6-3;
मायरा शेख[3] वि.वि.ख्याती मनीष 6-0;
तमन्ना नायर[2]वि.वि.शनाया सिंग 6-0;
मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अधिराज दुधाने[1] वि.वि.विद्युत सुंदर[14] 6-2;
यशवंतराजे पवार[8] वि.वि.शिवन त्यागी 6-3;
वीर चतुर[3] वि.वि. आरुष खन्ना 6-0;
कबीर गुंडेचा[9] वि.वि.श्लोक आळंद 6-3;
तक्षिल नागर[5] वि.वि.वीर गायकवाड[10] 6-4;
आरव शहा[15] वि.वि.नीव शेठ[4] 6-2;
सोहम राठोड[7] वि.वि.अर्जुन सैनी 6-0;
आरव छल्लाणी[2] वि.वि.दिव्यांग रसगोत्रा 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतची चूक नडली? ‘तो’ निर्णय घेतला असता, तर कदाचीत दिल्ली प्लेऑफ खेळली असती
प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण