fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विरोध केला, पण देशाचे वाचवले तीन अब्ज रुपये

Sri Lanka Eradicates Project Of $40 Million Worth Cricket Stadium On Advice Of Top Players

मुंबई । श्रीलंका येथे तीन अब्ज रुपये खर्चून देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात येणार होते. मात्र, श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धने यांच्या विरोधानंतर ही योजना रद्द करण्यात आली. श्रीलंकेचे पंतप्रधान यांनी नुकतेच ही योजना रद्द केल्याचे घोषित केले आहे.

माजी कर्णधार जयसूर्या आणि जयवर्धने यांनी क्रिकेट स्टेडियम बनवण्याऐवजी या योजनेतील पैसा युवा खेळाडूंच्या मदतीसाठी खर्च करावा अशी विनंती श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांच्याकडे केली होती. क्रिकेट स्टेडियम तयार करण्यासंदर्भात पंतप्रधानांची नुकतीच बैठक झाली होती. यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस काही माजी क्रिकेटपटू उपस्थित होते.

आता या योजनेतील सारा पैसा शालेय स्तरावरील क्रिकेटपटू आणि स्थानिक स्टेडियम उभा करण्यावर खर्च करण्यात येणार आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा या श्रीलंकेत व्हावा या उद्देशाने चाळीस हजार आसनांची व्यवस्था असलेले स्टेडियम तयार करण्यासाठी ही योजना बनवली होती.

माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याने या योजनेवर कडाडून टीका केली होती. त्याच्यामते, श्रीलंकाचा संघ विदेशात आणि मायदेशात जास्त क्रिकेट खेळणार नसल्याने स्टेडियमची आवश्यकता नसल्याचे तो म्हणाला. श्रीलंका बोर्डाच्या मते, क्रिकेटचा छोट्या फॉर्मेटला प्रोत्साहन देण्यासाठी एका स्टेडियमची गरज होती म्हणून ही योजना आखली होती.

You might also like