ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगच्या दहाव्या हंगामाला १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघांची संघबांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. बीबीएल २०१८ च्या उपविजेत्या होबार्ट हरिकेन्सने आगामी हंगामासाठी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याला करारबद्ध केले आहे. २० वर्षीय लामिछाने प्रथमच होबार्टसाठी खेळेल.
होबार्ट हरिकेन्ससाठी खेळणार लामिछाने
होबार्ट हरिकेन्सने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून लामिछानेसोबत करार झाल्याचे जाहीर केले आहे. करारबद्ध झाल्यानंतर लामिछानेने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “बीबीएलच्या आगामी हंगामासाठी होबार्ट संघात निवडले गेल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो. मला संधी दिल्याबद्दल क्लबचे आभार. ऑस्ट्रेलियात मला नेहमीच खूप सारे प्रेम मिळाले आहे. बीबीएल जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक असल्याचे मी मानतो.”
मागील वर्षी होता मेलबर्न स्टार्सचा सदस्य
वीस वर्षीय लामिछाने बिग बॅश लीगचे मागील दोन हंगाम मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळला होता. ज्यात त्याला २० सामन्यात १९.२० च्या सरासरीने २६ बळी टिपण्यात यश आले होते. यावेळी होबार्टच्या संघात डेविड मिलर, जॉर्ज बेली, जेम्स फॉकनर हे टी२० चे दिग्गज खेळाडू आहेत.
लमिछाने ठरू शकतो एक्स-फॅक्टर
होबार्ट हरिकेन्सचे मुख्य प्रशिक्षक ऍडम ग्रिफिथ यांनी लामिछानेचे कौतुक करताना म्हटले, “आम्हाला माहित आहे की, लामिछाने आपल्या मिस्ट्री स्पिनने एका षटकात सामन्याचा रंग बदलू शकतो. सामन्यातील कोणत्याही टप्प्यावर तो गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. संघाच्या गोलंदाज आक्रमणात लामिछानेमुळे चांगले वैविध्य आले आहे. तो आमच्यासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो. लामिछाने आमच्याशी करारबद्ध झालेला अखेरचा खेळाडू ठरला. या हंगामासाठी आता आम्ही कोणत्याही खेळाडूला करारबद्ध करणार नाही.
आयपीएलमध्ये होता दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य
लामिछाने आयपीएल २०२० मध्ये उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. बिग बॅश लीगला होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्याने सुरुवात होईल. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील मेलबर्न रेनगेड्स संघ स्पर्धेचा गतविजेता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“सांगा किती राशिद?”, राशिद खानने चाहत्यांना टाकलं कोड्यात
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी