क्रिकेटविश्वात अनेक युवा खेळाडू आहेत जे त्यांच्या वरिष्ठ खेळाडूंना फॉलो करत असतात. त्याचबरोबर त्यांची नक्कलदेखील करत असतात.
याबद्दल बुधवारी (8 जानेवारी) क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये 16 वर्षांखालील हॅरिस शिल्डच्या (Harris Shield) अंतिम सामन्याच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी त्यांचे मत मांडले आहे.
युवा पिढीच्या क्रिकेटपटूंनी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांसारख्या खेळाडूंना फॉलो केले पाहिजे, हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) आपला आदर्श बनवू नका, असे संदीप पाटील यावेळी म्हणाले.
“आम्ही ज्यावेळी खेळायचो त्यावेळी सन क्रीम वगैरे काहीही नव्हते. सूर्यही बदललेला नाही. आता तर हॅरिस आणि जाईस शिल्ड स्पर्धेत खेळाडू आपल्या चेहऱ्यावर क्रीम लावून फलंदाजी, गोलंदाजी, तसेच क्षेत्ररक्षण करतात. या हालचाली थांबवा आणि हार्दिक पंड्या बनू नका,” असेही आपल्या काळातील क्रिकेटबद्दल बोलताना पाटील असे म्हणाले.
“जर तुम्हाला चांगला खेळाडू बनायचे असेल तर राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर यांसारखे खेळाडू आहेत. तसेच अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) आहे. या खेळाडूंप्रमाणे बना”, असेही पाटील यावेळी म्हणाले.
…म्हणून पुणे टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी शार्दुलची होणार नाही हॅट्रिक
वाचा????https://t.co/nrLleqrGY9????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvSL @imShard— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020
माझ्यासाठी या देशाविरुद्ध खेळणे मोठे आव्हान असेल- रोहित शर्मा
वाचा- ????https://t.co/Wrj0BmrS1Q????#म #मराठी #Cricket @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020