Loading...

आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संदिप्ती सिंग रावचा ग्रेट ब्रिटनच्या इरीन रिचर्डसनवर सनसनाटी विजय

पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित  आयटीएफमहाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणिपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या  गटात भारताच्या संदिप्ती सिंग राव हिने ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकित इरीन इरीन रिचर्डसनचा टायब्रेकमध्ये  6-1, 7-6(0)असा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला. 

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या भारताच्या श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती हिने तैपेईच्या यु-यून लीचा 2-6, 7-5, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. सहाव्या मानांकित भारताच्या सालसा आहेर हिने थायलंडच्या लालना तारारुदीचा 2-6, 6-2, 6-2असा संघर्षपूर्ण पराभव केला. अव्वल मानांकित भारताच्या शिवानी अमिनेनीने क्वालिफायर गार्गी पवारला 6-2, 6-2असे पराभूत केले. 

मुलांच्या गटात अव्वल मानांकित सिद्धांत बांठिया याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या आर्यन भाटियाचा 6-1, 6-2असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या दुसऱ्या मानांकित मन शहाने मधवीन कामतला 6-3, 4-6, 6-4असे नमविले. चुरशीच्या झालेल्या लढतीत थायलंडच्या चौथ्या मानांकित कसीदीत समरेज याने पोलंडच्या जॅण वाजदेमाजरचे आव्हान 4-6, 6-4, 6-4असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित भारताच्या सच्चीत शर्मा याने ग्रेट ब्रिटनच्या जॅक पिनिंगटनजॉन्सवर 3-6, 6-1, 7-5असा विजय मिळवला. सुशांत दबसने डेनिम यादवचा 6-3, 7-5असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:  

सिद्धांत बांठिया(भारत)(1)वि.वि. आर्यन भाटिया(भारत) 6-1, 6-2;

Loading...

कसीदीत समरेज(थायलंड)(4)वि.वि.जॅण वाजदेमाजर(पोलंड) 4-6, 6-4, 6-4;

सच्चीत शर्मा(भारत)(3)वि.वि.जॅक पिनिंगटनजॉन्स(ग्रेट ब्रिटन)3-6, 6-1, 7-5;

रयुही अझूमा(जपान)(7)वि.वि.क्रिश पटेल(भारत) 6-1, 2-6, 6-2;

देव जाविया(भारत)(5)वि.वि.लॅन्सलॉट कार्नेलो(स्वीडन) 6-3, 6-3;

Loading...

मन शहा(भारत)(2)वि.वि.मधवीन कामत(भारत) 6-3, 4-6, 6-4;

पीटर पावलक(पोलंड)(6)वि.वि.  संजीत देवीनेनी(यूएसए) 6-3, 4-6, 6-2;

सुशांत दबस(भारत)वि.वि.डेनिम यादव(भारत)6-3, 7-5;

 

Loading...

मुली:  

शिवानी अमिनेनी(भारत)(1)वि.वि.गार्गी पवार(भारत) 6-2, 6-2;

श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती(भारत)वि.वि. यु-यून ली(तैपेई) 2-6, 7-5, 6-3;

सालसा आहेर(भारत)(6)वि.वि.लालना तारारुदी(थायलंड)2-6, 6-2, 6-2;

पिमरादा जट्टावापोर्नवीत(थायलंड)(5)वि.वि.जगमीत कौर ग्रेवाल(भारत)7-5, 6-1;

Loading...

मातीलदा मुटावडेझीक(ग्रेट ब्रिटन)(3)वि.वि.शरण्या गवारे(भारत) 6-2, 6-2;

कोहरू निमी(जपान)(4)वि.वि.प्रेरणा विचारे(भारत)6-2, 7-5;

इरीका मतसुदा(जपान) वि.वि इव इलीना कोंतारेवा(रशिया) 6-4, 6-1;

संदिप्ती सिंग राव(भारत)वि.वि.इरीन रिचर्डसन(ग्रेट ब्रिटन)(2) 6-1, 7-6(0).

You might also like
Loading...