fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टेनिसपटू सानिया मिर्झाचे आहेत या क्रिकेट कर्णधारांशी कौटुंबिक संबंध

Sania Mirza Cricket connection Four cricket Captains in her Family

भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा दोन वर्षांच्या प्रसूतीच्या रजेवरुन परतल्यानंतर २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तयार होती. परंतु सध्या कोविड-१९च्या साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तिला आशा आहे की, ती पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंम्पिकसाठी टोकियोमध्ये उपस्थित असेल.

सानियाने (Sania Mirza) बुधवारी (६मे) भारतीय क्रीडा प्राधिकरणने (SAI) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये म्हटले की, “मी वयाच्या ६व्या वर्षांपासून टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यावेळी जर कोणतीही मुलगी रॅकेट पकडून विम्बल्डनमध्ये खेळण्याचे स्वप्न पहात असेल, तर तिच्यावर इतर लोक हसत होते. लोक काय म्हणतील हे वाक्य अनेक स्वप्नांना तोडून टाकते. मी भाग्यशाली होते की मला असे आई-वडील मिळाले ज्यांनी कोणाचीही चिंता न करता माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पाठिंबा दिला.”

सानियाच्या नावावर ३ दुहेरी आणि ३ मिश्र दुहेरी असे मिळून एकूण ग्रँड ६ स्लॅम्सचे विजेतेपद आहेत. तिने यावर्षी कोर्टवर पुनरागमन करत यूक्रेनी जोडीदार नाडिया किचेनोकबरोबर होबार्ट आंतरराष्ट्रीय महिला डबल्सचे विजेतेपदक जिंकले होते. तरी ती दुखापतीमुळे आपले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवण्यात अयशस्वी ठरली.

सानियाला क्रिकेट खूप आवडते, हे सर्वांना माहित आहे. तिने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर लग्न केले असावे. एका मुलाखतीदरम्यान तिने मान्य केले की, “जर मी पुरुष असते तर मी नक्कीच क्रिकेट खेळत असते.” सानियाचे वडील इमरान मिर्झा मुंबईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. इतकेच नव्हे तर, सानियाच्या कुटुंबात सुरुवातीपासूनच २ क्रिकेट कर्णधार राहिले. ज्यांनी अनुक्रमे भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व केले.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये सानियाची लहान बहीन अनमचे लग्न मोहम्मद अझरूद्दीनचा (Mohammad Azharuddin) मुलगा असदबरोबर झाला आहे. सानियाच्या परिवारात अझरूद्दीन चौथा क्रिकेट कर्णधार आहे, जो तिचा नातेवाईक बनला आहे. 

२०१०मध्ये सानियाचे शोएब मलिकबरोबर (Shoaib Malik) लग्न झाले होते. शोएबनेही पाकिस्तान संघाचे ३ कसोटी, ४१ वनडे आणि २० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.

सानियाचा चुलत भाऊ निसार अहमद आहे. निसारचे वडील गुलाम अहमदने १९५५-५९ दरम्यान ३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

सानियाचे नाते पाकिस्तानचा माजी कर्णधार आसिफ इक्बालबरोबरही आहे. गुलाम अहमदच्या बहिणीचा मुलगा आसिफ १९६१मध्ये हैद्राबादमधून पाकिस्तान निघून गेला होता. आसिफने ६ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि हे सर्व सामने त्याने भारतामध्ये खेळले होते. तेव्हा पाकिस्तानने त्याच्या नेतृत्वात ६ सामन्यांची कसोटी मालिका ०-२ने गमावली होती.

ट्रेंडिंग घडामोडी-

-बॅटप्रमाणे आता चेंडूमध्येही होणार बदल? जेणेकरून गोलंदाजांना…

-वॉर्नरने सांगितला विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथमधील हा मोठा फरक

-या कारणामुळे भारताचा हा माजी गोलंदाज विराटवर भलताच संतापला

You might also like