fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सानिया मिर्झा म्हणते, शोएब मलिकची ही गोष्ट अजिबात आवडत नाही

Sania Mirza Reveals what she hates about her Husband Shoaib Malik

नवी दिल्ली । भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराशी बोलताना आपला पती शोएब मलिकबद्दलच्या सर्वात न आवडणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

शोएबबद्दल बोलताना ती म्हणाली की, जेव्हा शोएब (Shoib Malik) आणि तिच्यात भांडण होते, तेव्हा तो एकदम शांत असतो आणि कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो आपल्या मनातील गोष्टी सांगत नाही किंवा भांडण त्याचवेळी संपविण्याचा प्रयत्नदेखील करत नाही. त्याची हीच सवय सानियाला आवडत नाही.

सानियाने पाकिस्तानची क्रीडापत्रकार झैनब अब्बासशी (Zainab Abbas) शोएबबरोबरच्या आपल्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. ती म्हणाली की, “आमच्यात जरी भांडण झाले तरीही आमची चर्चा सुरुच असते. भांडण झाले की शोएब काही बोलत नाही आणि गप्प राहतो. त्यावेळी माझा असा प्रयत्न असतो की, हे भांडण संपवले पाहिजे. कारण गोष्टी पुढे खूप काळापर्यंत ताणू शकतात.”

“मी चर्चा करून भांडण संपवणाऱ्यांपैकी एक आहे. तर शोएब आरामात चर्चा करण्यावर विश्वास ठेवतो. मी जेव्हा खूप काही बोलत असते, तेव्हा तो आपल्या फोनवर मग्न असतो. मला याची खूप चिड येते. मी हे सांभाळू शकत नाही,” असे ६ वेळा ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावणारी सानिया म्हणाली.

जेव्हा सानियाला विचारले की, तुझी एखादी अशी कोणती गोष्ट आहे जी शोएबला आवडत नाही?, यावर प्रत्युत्तर देताना सानिया म्हणाली की, “मी आयुष्यात खूप कमी ध्यैर्यवान आहे. माझ्या मते शोएबला माझी हीच गोष्ट आवडत नसेल.”

सानिया (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू (Cricketer) शोएबचे लग्न २०१०मध्ये झाले होते. तसेच त्यांचे लग्न खूप मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलं होतं. कारण एकीकडे सानिया भारताची यशस्वी टेनिसपटू (Tennis Player) होती, तर दुसरीकडे शोएब पाकिस्तान संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू होता.

लग्नाच्या १० वर्षांनंतरही या दोघांमधील प्रेम कमी झाले नाही. तसेच ते दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांनाही एक मुलगा आहे. त्याचे नाव त्यांनी इजहान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) असे ठेवले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-फाफ डू प्लेसिसनंतर आता ‘हा’ खेळाडू करणार दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे नेतृत्व..?

-विराट कोहलीचा ‘हा’ शॉट जगातील सर्वोत्तम

-किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच

You might also like