भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघातील मुख्य फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले, तर खालच्या फळीतील फलंदाजांनी काही आकर्षक शॉट खेळले. दरम्यान, जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah six) मारलेल्या शॉटनंतर संजना गनेशनने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, पहिल्या डावातील ६२ व्या षटकात जसप्रीत बुमराहने कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतर त्याने २ चौकार देखील मारले. कागिसो रबाडासारख्या वेगवान गोलंदाजाला जसप्रीत बुमराहने २ चौकार आणि १ षटकार मारत १४ धावा ठोकल्या.
बुमराहने षटकार मारल्यानंतर संजनाने दिली अशी रिॲक्शन
कागिसो रबाडाने वेगवान बाऊन्सर चेंडू टाकला होता, ज्यावर जसप्रीत बुमराहने हुकचा फटका मारत षटकार मारला. हा षटकार पाहून, स्टँड्समध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी संजना गनेशन भलतीच खूश झाली होती. ती जोरजोरात टाळ्या वाजवत होती. तसेच तिला हसू देखील अनावर झाले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Sanjana Ganeshan reaction on jasprit bumrah six)
हा षटकार मारल्यानंतर देखील तो थांबला नाही. त्याने षटकातील पाचव्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने चौकार मारला. तो या डावात ११ चेंडूंमध्ये १४ धावा करत नाबाद राहिला. आता दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी ) भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा डाव संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे.
https://twitter.com/LoduLal02410635/status/1478003655290732544
भारतीय संघाने पहिल्या डावात केल्या २०२ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलने १३३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५० धावांची खेळी केली, तर आर अश्विनने ५९ चेंडूंमध्ये तुफानी ४६ धावांची खेळी केली. तसेच मयांक अगरवालने ३७ चेंडूंमध्ये २६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाचा संपूर्ण डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघाला १ बाद ३५ धावा करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
जोहान्सबर्गमधील टीम इंडियाची ‘ती’ परंपरा ‘कॅप्टन’ राहुलमूळे अबाधित
विराट-रहाणे आणि पुजाराला भारी पडला एकटा रूट! पाहा ही ‘अविश्वनिय’ आकडेवारी
हे नक्की पाहा : हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक