सोमवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा निर्णय सार्थी लावत तुफानी अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने मोठा विक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने या डावात ५७ चेंडूंचा सामना करत ८२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले होते. या डावातील तिसरा षटकार मारताच त्याने आयपीएल स्पर्धेत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो १४ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ७० धावांची खेळी केली होती. तरीदेखील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्याची ही खेळी पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला होता. हीच अप्रतिम फलंदाजी त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील सुरू ठेवली. या डावात त्याने ८२ धावा केल्या. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत ३ हजार धावा देखील पूर्ण केल्या.
Milestone Alert 🚨 – 3000 #VIVOIPL runs and counting for @IamSanjuSamson 👏👏#SRHvRR pic.twitter.com/9A71tT6156
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
असे करणारा तो तब्बल १४ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि तिसऱ्या स्थानी सुरेश रैना आणि एमएस धोनी सारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.
आयपीएल स्पर्धेत ३ हजार पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
१)विराट कोहली
२)रोहित शर्मा
३)शिखर धवन
४)सुरेश रैना
५)एमएस धोनी
६)रॉबिन उथप्पा
७)गौतम गंभीर
८)दिनेश कार्तिक
९)अजिंक्य रहाणे
१०)अंबाती रायुडू
११)मनीष पांडे
१२)युसुफ पठाण
१३) केएल राहुल
१४)संजू सॅमसन
महत्त्वाच्या बातम्या-
RRvSRH, Live: पदार्पणवीर जेसन रॉय अर्धशतक करुन बाद, १३ षटकांनंतर हैदराबादच्या ३ बाद ११९ धावा