मुंबई । भारताचा माजी सलामीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला मुल्तानचा सुलतान म्हटले जाते. कारण पाकिस्तानच्या मुलतान कसोटीत 309 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने सेहवागच्या त्रिशतकाचे सचिनच्या शतका बरोबर तुलना केली आहे.
सकलेन मुश्ताकच्या मते, सेहवागच्या त्रिशतकापेक्षा सचिनची 1999 साली केलेली शतकी खेळी महत्त्वपूर्ण होती. सकलेन मुश्ताक म्हणाला, “सचिनची ती खेळी संघास विजयाकडे घेऊन जाणारी होती तर सेहवागची मुलतान कसोटीतील खेळी सामन्याच्या पहिल्याच दिवशी केली होती.”
सकलेन मुश्ताक युट्यूब चॅनेलवरील ‘क्रिकेटबाज’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “चेन्नई कसोटीतील सचिनची दुसऱ्या डावातील 130 धावांची खेळी सेहवागच्या त्रिशतक पेक्षा वरती ठेवेन. कारण आम्ही पूर्ण तयारीनुसार या दौऱ्यावर गेलो होतो. खूपच संघर्षपूर्ण हा सामना होता. दोन्ही संघात चांगले खेळाडू होते.”
“2004 साली मुलतान कसोटीत झालेल्या सेहवागने पहिल्या डावात त्रिशतकी खेळी केली. त्याच्या आईवडिलांचे चांगले काम आणि त्याच्या काही चांगल्या गुणांमुळे त्याला ही खेळी करण्यास मदत झाली. संपूर्ण तयारीनुसार पाकिस्तानचा संघ या कसोटीत उतरला नव्हता. त्या वेळी पाकिस्तानच्या संघात टक्कर देणारे चांगले खेळाडू होते. तेव्हा दोन्ही डावात पाकिस्तानविरुद्ध खेळली गेलेली सचिनची खेळी महत्त्वपूर्ण आहे,” असे सकलेन मुश्ताकने सांगितले.