सध्या क्रिकेट वर्तुळात दोन दिवसापूर्वी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्याचीच चर्चा सुरू आहे. रविवारी (28 ऑगस्ट) दुबई येथे झालेल्या आशिया चषक 2022 स्पर्धेच्या 15व्या हंगामात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तानचा हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने एका पत्रकाराबाबत केलेल्या ट्वीटने एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने ट्वीट करत लिहिले, ’17व्या षटकात 5 क्षेत्ररक्षक षटकांच्या कमी गतीमुळे 30 यार्ड वर्तुळाच्या आत होते. तर एका महिला पत्रकाराने टीव्हीवर पाकिस्तानला नाही धावा करत, नाही झेल पकडत असे टोमणे मारले आहे. हे आश्चर्यकारक आहे.’
Pak had the disadvantage after 17th over 5 fielders were inside the circle cuz of slow over rate & 1 of the so called female journalist on national Tv bashing Pakistan team after a fighting match & saying na run karte hai na catch pakarte hai kamal hai bhi🤷♂️ #headsUpBoys 🇵🇰
— Sarfaraz Ahmed (@SarfarazA_54) August 28, 2022
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाकडून निर्धारित वेळेत षटके टाकली गेली नाहीत. यामुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोन्ही संघाला त्याची शिक्षाही केली आहे.
आयसीसीच्या जुन्या नियमानुसार सामन्याच्याशेवटी षटकांची गती कमी राखल्याने संघावर त्या सामन्यांतील काही शुल्काचा दंड आकारला जात होता. मात्र आता नव्या नियमानुसार, गोलंदाजी करणारा संघ निर्धारित वेळेत कमी षटके टाकत मागे राहिला असेल, तर त्या संघाला 30 यार्ड वर्तुळात आणखी एका खेळाडूला ठेवणे बंधनकारक आहे. यामुळे आयसीसीने दोन्ही संघाला शेवटच्या तीन षटकात 30 यार्डच्या वर्तुळात 4 ऐवजी 5 क्षेत्ररक्षकांना ठेवणे बंधनकारक केले.
सरफराजने ट्वीट करताच ते चांगलेच व्हायरल झाले आहे. तसेच नेटकऱ्यांनीही त्याला वरचढ रिप्लाय दिले आहेत.
https://twitter.com/Subodhmiahra98/status/1564000366072852480?s=20&t=CgBPCiiwPlDAMP-iaPbc0Q
India ke bhi 5 fielder 3 overs k liye inside the circle the, ye to koi excuse nhi hua miya…😅😅😅
— Bhanu Thakur🇮🇳 (@BhanuThakur04) August 29, 2022
Bhi to ajeeb logic dai rahai ho slow over rate kis ki waja sai hua kya yeh captain ke zemadari nahi hai ?
— Shahid Ali (@ImShahidali55) August 29, 2022
Name and shame them who are criticizing team Pakistan today. They have put an extra effort today. Naseem Shah clicking 145 after injury during the game. Learn to appreciate when team Pakistan fight upto the last bowl. Well said Sarfaraz 👏👏
— Mushahid Hussain Marwat (@mushahid345) August 28, 2022
तसेच आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामात पाकिस्तान संघाचा पुढील सामना 2 सप्टेंबरला हॉंगकॉंग विरुद्ध आहे, तर भारताचा पुढील सामना 31 ऑगस्टला हॉंगकॉंग विरुद्धच आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारत-पाकिस्तान जिंकले तर पुन्हा एकदा चाहत्यांना रविवारी (4 सप्टेंबर) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्याच्या सामना पाहण्याची संधी आहे.
महत्वाच्या बातम्या-