जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली. दिल्ली कॅपिटल संघाने देखील आपले सराव सत्र सुरू केले असून, यामध्ये बरेच भारतीय क्रिकेटपटू सहभागी झालेत. मात्र, त्याचवेळी दिल्लीच्या संघाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय.
दिल्ली संघाचा भाग असलेला सर्फराज खान सध्या इंडिया ए संघासोबत कोलकाता येथे सराव करत होता. त्यावेळी सर्फराज याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. ही दुखापत फारसे गंभीर नसली तरी डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला. याच कारणाने 1 मार्चपासून सुरू होत असलेल्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी त्याची रेस्ट ऑफ इंडिया संघात निवड केली गेली नाही. त्यामुळे आता तो थेट आयपीएल खेळताना दिसेल.
दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत हा अपघातामुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे दिल्ली संघ व्यवस्थापनाने सर्फराजला त्याच्या जागी यष्टीरक्षण करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. सर्फराज मागील तीन वर्षांपासून रणजी हंगामात खोऱ्याने धावा काढतोय. यावर्षी देखील त्याने मुंबईसाठी 92 च्या सरासरीने 556 धावा काढलेल्या. सातत्याने चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात त्याची निवड होत नसल्याने अनेकांनी भारतीय निवड समितीवर टीका केलेली.
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ-
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार (, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रॉवमन पॉवेल, सर्फराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिक नोर्कीए, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजूर. रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे, रायली रुसो.
(Sarfraz Khan Injured Before Irani Trophy Delhi Capitals In Tension)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा