Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल 39 वर्षानंतर भारताने जिंकले फ्रेंच ओपन! सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीला पुरूष दुहेरीचे विजेतेपद

तब्बल 39 वर्षानंतर भारताने जिंकले फ्रेंच ओपन! सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीला पुरूष दुहेरीचे विजेतेपद

October 31, 2022
in टॉप बातम्या, बॅडमिंटन
Satwik SaiRaj & Chirag Shetty

Photo Courtesy: Twitter/ Chirag Shetty


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी (30 ऑक्टोबर) भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. त्यामुळे भारतीय चाहते निराश झाले, मात्र त्याच दिवशी भारताच्या दोन खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी फ्रेंच ओपन पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या लू चिंग याओ-यांग पो हान यांचा 21-13, 21-19 असा पराभव केला.

फ्रेंच ओपन जिंकणारी सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwik SaiRaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) ही भारताची केवळ दुसरीच जोडी ठरली आहे. त्याचबरोबर सुपर 750 चा किताब पटकावणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

कारकिर्दीतील मोठा विजय
सात्विक-चिराग जोडी सध्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. त्यांना या स्पर्धेच्या 2019च्या हंगामामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांनी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानावर असलेल्या लू-यांग जोडीचा 49 मिनिटांत पराभव केला.

2022 मधील विजेतेपद
यावर्षी सात्विक-चिराग ही भारतीय जोडी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले. त्यातबरोबर इंडियन ओपन सुपर 500चे विजेतेपद आणि कॉमनवेल्थ गेम्सचे सुवर्णपदक तसेच थॉमस कपही जिंकला.

𝗝𝗢𝗗𝗜 𝗡𝗢. 1️⃣! 😎

First-ever #Super750 🏆, 2️⃣nd #BWFWorldTour 👑 this year. ✅

Super proud of this duo. 🤙@himantabiswa | @sanjay091968 #FrenchOpen2022#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/t09ATja7he

— BAI Media (@BAI_Media) October 30, 2022

कठीण होता अंतिम सामना
फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात भारताच्या जोडीने पहिल्यापासून 5-0 अशी जबरदस्त आघाडी घेतली होती. नंतर त्याची आपला खेळ उंचावत पहिला सेट 11-6 असा केला. पुढे त्यांनी हा सेट 21-13 असा आपल्या नावे केला. यामुळे चायनीज खेळाडूंना दुसऱ्या सेटची उत्तम सुरूवात करणे आवश्यक होते, मात्र भारताच्या खेळाडूंनी त्यांना संधीच दिली नाही आणि सेटमध्ये पुन्हा एकदा 11-5 अशी मोठी आघाडी घेतली. पण काही वेळानंतर चायनीज खेळाडूंनी हार मानली नाही आणि दुसरा सेट 14-14 बरोबरीत आणला.

From paris with ❤️. #FrenchOpen pic.twitter.com/jVhp5BexkQ

— Chirag Shetty (@Shettychirag04) October 31, 2022

दुसरा सेट चांगलाच अटीतटीचा झाला. दोन्हीकडून एक-एक पाईंट्स येतच राहिले. हे 19-19 असा सेट होईपर्यंत चालले. नंतर सात्विकच्या आक्रमक स्मॅशने भारताने दुसरा सेट जिंकला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

भारताकडून फ्रेंच ओपन जिंकणारी पहिली जोडी पार्थो गांगुली आणि विक्रम सिंग ठरली. त्यांनी 1983मध्ये अशी कामगिरी केली होती, मात्र तेव्हा आत्ताप्रमाणे एन्जॉय केले जात नव्हते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीके नायडूंनी 90 वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
तीन षटकार मारून मिलरने संघाला विजयी केलं, पण रोहितच्या विक्रमाला धक्का लावण्यात ठरला अपयशी


Next Post

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

Photo Courtesy: Twitter/ICC/BCCI

अन् 'त्या' दिवसाची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली

Virat Kohli

धक्कादायक, विराटच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ लीक; किंग कोहलीचा राग अनावर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143