इंडियन प्रीमियर लीगमधून आपली वेगळी ओळख तयार केलेल्या सौरभ तिवारी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सौरभ तिवारी इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या प्रदर्शाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कधीच उमलली नाही. अवघ्या तीन वनडे सामन्यावर त्याला समाधान मानावे लागले. सोमवारी (12 फेब्रुवारी) 34 वर्षीय सौरभने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय सर्वांना कळवला.
सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचा खेळाडू आहे. तो आपल्या मोठमोठ्या शॉट्ससाठी ओळखला जातो. एकेकाळी त्याला भारतीय संघाचा पुढचा एमएस धोनी (MS Dhoni) म्हटले जायचे. कारकिर्दीच्या सुरुवाती त्याने अगदी धोनीप्रामाणे मोठे केस ठेवून क्रिकेट खेलायला सुरुवात केली होती. तेव्हापासून चाहते धोनीशी त्याची तुलना करत होते. पण प्रत्यक्षात मात्र, सौरभला भारतासाठी फक्त तीन वनडे सामने खेळत आले. त्याने 2010 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण या तीन सामन्यांमध्ये त्याने अवघ्या 49 धावा केल्या. 34 वर्षीय सौरभ सध्या रणजी ट्रॉफी 2024 मध्ये झारखंडचे प्रतिनिधित्व करत आहे. 15 फेब्रुवारी रोजी राजस्थानविरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा क्रिकेट सामना असेल.
सोमवारी पत्रकार परिषदेत सौरभ कुमारने निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, “या प्रवासात अलविदा म्हणणे थोडे कठीण आहे. माझ्या शेळेतील दिवसांच्या आधी मी हा प्रवास सुरू केला होता. पण मला विश्वास आहे की, ही योग्य वेळ आहे. मला वाटते, जर तुम्ही राष्ट्रीय संघात आणि आयपीएल हंगात नसाल, तर युवा खेळाडूंसाठी राज्याच्या संघांमध्ये जागा मोकळी केली पाहिजे. आमच्या संघात आता युवा खेळाडूंना भरपूर संधी दिल्या जात आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेत आहे.”
Happy retirement Saurabh Tiwary.
Streets won’t forget your IPL 2010 performance. pic.twitter.com/b8bainRjDR— R A T N I S H (@LoyalSachinFan) February 12, 2024
सौरभने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी क्रिकेट खेलायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याने 2006-07 रणजी हंगामातून प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. 115 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 47.51च्या सरासरीने 8030 धावा केल्या. यात 22 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. 2008 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही सौरभ भाग होता. विराट त्यावेळी या संघाचा कर्णधार होता.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सौरभ मुंबई इंडियन्सचा एकेकाळी महत्वाचा खेळाडू होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि रायजिंक पुणे सुपरजयंट्स संघाकडूनही त्याने आयपीएल खेळली. कारकिर्दीत एकूण खेळलेल्या 93 आयपीलए सामन्यांमध्ये त्याने 28.73च्या सरासरीने 1244 धावा केल्या आहेत. आयपीएल 2010 मधील शानदार प्रदर्शनानंतर त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात निवडले गेले. पण या स्पर्धेत त्याला देशासाठी पदार्पण करता आले नाही. पण ऑक्टोबर 2010 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून भारतासाठी वनडे पदार्पण केले. डसिेंबर 2010 मध्ये त्याने कारकिर्दीतील तिसरा वनेड सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. पण हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा सामना शेवटचा ठरेल, असे तेव्हा कुणालाच वाटले नव्हते. (Saurabh Tiwary retired from all forms of cricket)
महत्वाच्या बातम्या –
U19 WC टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा, एक-दोन नाही तर चार भारतीयांना मिळाले स्थान
जामनेरमध्ये सिकंदर शेख अन् चौधरीचा विजय, १५ विजेत्यांना चांदीच्या गदा, मानाचा पट्टा आणि लाखोंची बक्षिसे