भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा सामना येत्या 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल, जो ॲडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. मात्र या सामन्यातून दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर असून त्याच्या जागी शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेटला ऑस्ट्रेलियन कसोटी संघात संधी मिळाली आहे. ॲबॉट याआधी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आणि टी20 सामने खेळला आहे. परंतु डॉगेटने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
32 वर्षीय शॉन ॲबॉटने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, ज्यामध्ये त्याच्या नावावर 261 प्रथम श्रेणी विकेट्स आहेत. त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.
ऑस्ट्रेलियाचा आश्वासक क्रिकेटपटू फिलिप ह्यूजचा 2014 मध्ये शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला होता. तेव्हा शॉन ॲबॉट गोलंदाजी करत होता. त्याचा चेंडू ह्यूजच्या मानेच्या खालच्या भागात लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ब्रेंडन डॉगेटचा दुसऱ्यांदा कसोटीत समावेश करण्यात आला आहे. याआधी 2018 मध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यूएईला गेला होता. 32 वर्षीय डॉगेटने आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 142 विकेट्स घेतल्या आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी ब्रेंडन डॉगेट आणि शॉन ॲबॉट यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला असला तरी या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे कठीण आहे. कारण ऑस्ट्रेलियाकडे आधीच स्कॉट बोलँडच्या स्टार गोलंदाज आहे. तसेच मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स संघात उपस्थित आहे.
हेही वाचा-
केन विल्यमसननं रचला इतिहास, न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
इशान किशनची 334.78 च्या स्ट्राईक रेटने ऐतिहासिक खेळी, झारखंडचा विश्वविक्रम!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; दुखापतीतून परताणारा मोहम्मद शमी पुन्हा जखमी!