पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी विराज दारवाटकर(104 धावा) याने केलेली शतकी खेळीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने डेक्कन जिमखाना संघापुढे 312 धावांचे आव्हान उभे केले आहे.
डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज 81षटकात 8बाद 312धावा करून संघाचा डाव घोषित केला. यात विराज दारवाटकर याने धडाकेबाज फलंदाजी करताना 161 चेंडूत 12चौकार व 2षटकारांच्या मदतीने 104 धावा व राजवर्धन उंडरेने 127 चेंडूत 6चौकार व 1षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. विराज व राजवर्धन यांनी दुसऱ्या गडयासाठी 229चेंडूत 152धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर स्वप्निल 61(74), सुरज फरगडे 25, आदित्य 17 यांनी धावा करून संघाला 312 धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखानाकडून आर्यन बांगले(104-4) व रेहान खान(60-3यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात पूना क्लब संघाने आजदिवस अखेर 7षटकात बिनबाद 40धावा केल्या. यात अथर्व वणवे नाबाद 25धावा, यश बोरामनी नाबाद 9धावांवर खेळत आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 81षटकात 8बाद 312धावा(डाव घोषित)(विराज दारवाटकर 104(161,12×4,2×6), राजवर्धन उंडरे 74(127,6×4,1×6), स्वप्निल 61(74), सुरज फरगडे 25, आदित्य 17, रेहान खान 20-60-3, आर्यन बांगले 23-104-4, धीरेन मते 9-30-1)वि.डेक्कन जिमखाना: 7षटकात बिनबाद 40धावा(अथर्व वणवे नाबाद 25(30), यश बोरामनी नाबाद 9)