Loading...

पीवायसी बुद्धिबळ लीग २०१९ स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाने किंग्स 64 संघाचा पारभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाने किंग्स 64 संघाचा 4-2 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. यश मेहेंदळेने अकांश जैनचा 1-0 असा पराभव करत सामन्यात विजयी सुरूवात केली. राजेंद्र एरंडेने शर्मीला शहाचा 1-0 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. परम जलनने राघव बर्वेचा तर मिहिर शहाने जय केळकरचा अनूक्रमे प्रत्येकी 1-0 असा पराभव करत आघाडी कायम राखत संघाला विजय मिळवून दिला.

दुस-या लढतीत 7 नाईट्स संघाने द बिशप्स चेक संंघाचा 4.5-1.5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. निखिल चितळेने अभिषेक गोडबोलेचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आघाडी घेतली. तन्मय चितळेने चारू साठेचा तर सारंग उधवर्षेने केतन देवलचा अनूक्रमे 1-0 असा पराभव करत आघाडी कायम राखली. शुभंकर मेनन याने असिम देवगावकरचा 1-0 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. विजय देशपांडेने अश्विन त्रिमलसह 1.5-1.5 अशी बरोबरी साधत संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत गोल्डन किंग संघाने वाडेश्वर विझार्डस संघासह 3-3 अशी बरोबरी साधली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंड रॉबीन फेरी

किंग्स 64 पराभूत वि मराठा वॉरियर्स 2-4(अकांश जैन पराभूत वि यश मेहेंदळे 0-1; शर्मीला शहा पराभूत वि राजेंद्र एरंडे 0-1; रोहिन लागु वि.वि आदी जाधव 1-0; आदित्य लाखे वि.वि अमित धर्मा 1-0; राघव बर्वे पराभूत वि परम जलन 0-1; जय केळकर पराभूत वि मिहिर शहा 0-1);

गोल्डन किंग बरोबरीत वि वाडेश्वर विझार्डस 3-3(ईशान लागु वि.वि रामकृष्ण मेहेंदळे 1-0; विजय ओगळे वि.वि कौस्तुभ वाळिंबे 1-0; अमोद प्रधान पराभूत वि अक्षय साठे 0-1; राजशेखर करमरकर पराभूत वि कुणाल भुरत 0-1; प्रशांत कुलकर्णी पराभूत वि रोनित जोशी 0-1; पराग चोपडा वि.वि अमोल मेहेंदळे 1-0);

Loading...

द बिशप्स चेक पराभूत वि 7 नाईट्स 1.5-4.5(अभिषेक गोडबोले पराभूत वि निखिल चितळे 0-1; किरण खरे वि.वि आदित्य भट 1-0; चारू साठे पराभूत वि तन्मय चितळे 0-1; अश्विन त्रिमल बरोबरीत वि विजय देशपांडे 1.5-1.5; केतन देवल पराभूत वि सारंग उधवर्षे 0-1; असिम देवगावकर पराभूत वि शुभंकर मेनन 0-1).

You might also like
Loading...