आज (१९ फेब्रुवारी) जगभरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सामान्य जनतेपासून सर्व क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी छत्रपतींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेदेखील ट्विटरच्या माध्यमातून एका खास संदेशासह सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
जगभरात साजरा होत आहे शिवजयंती
जगभरात आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. या जयंती निमित्ताने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, कोविड-१९ या आजारामुळे या वर्षी काही बंधने घालण्यात आली आहे. तरीदेखील, लोकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
सेहवागने दिल्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेदेखील ट्विटरवरून देशवासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सेहवागने ट्विट करताना लिहिले, “इतिहास सांगतो, शक्तिशाली ठिकाणावरून शक्तिशाली लोक पुढे येत असतात. मात्र, हा इतिहास चुकीचा होता. शक्तिशाली व्यक्ती त्या ठिकाणाला शक्तिशाली बनवतात. महान छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा. जय मा भवानी.” सेहवागने या ट्विटसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छायाचित्र देखील शेअर केले आहे.
“History tells us that powerful people come from powerful places. History was wrong! Powerful people make places powerful"
Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti.
Jai Maa Bhavani pic.twitter.com/frRS8hroEc— Virender Sehwag (@virendersehwag) February 19, 2021
या क्रिकेटपटूनीं देखील दिल्या शुभेच्छा
वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने शिवजयंतीच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या. त्याने लिहिले, “आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” तर, रहाणेने शुभेच्छा देताना, आपण छत्रपतींकडून कायम प्रेरणा घेत असतो असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई इंडियन्सचे भविष्य म्हटले जात असलेला मार्को जेन्सन आहे तरी कोण?
मोठी बातमी: श्रीलंका क्रिकेटला तगडा झटका, १८ शतके करणाऱ्या फलंदाजासह १५ क्रिकेटर सोडणार देश!