याचवर्षी हॅंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना वरिष्ठ गटाची ४०वी राष्ट्रीय रोईंग स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून पुण्यात रंगणार आहे. लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ट्रॅकवर ही स्पर्धा होणार असून, यासाठी ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेले हे एकमेव रोईंग केंद्र असून, येथे २५ राज्यातील स्पर्धक आपले कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना संघटन सचिव कर्नल आर. रामकृष्णन म्हणाले, आम्हाला देशातील सर्वोत्तम खेळाडूंच्या स्पर्धेचे आयोजन करताना आनंद होत आहे. या सर्व दर्जेदार खेळाडूंसाठी सर्व सुविधांनी असा मार्ग सज्ज आहे. ऑलिम्पियन, आशियाई आणि राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग असेल.
टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची जोडी अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंग यांचे प्रमुख आकर्षण असेल. ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी ही भारताची पहिली जोडी ठरली होती. त्यानंतर याच जोडीने गेल्यावर्षी थायलंड येथील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. या खेरीज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अन्य पदक विजेते सुखमीत सिंग-झाकर खान (डबल्स स्कल्स), जसवीर सिग, इक्बाल सिंग, अक्षत तंवर, चरणजीत सिंग (लाईटवेट कॉक्सलेस फोर्स), जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष हे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय रोईंग महासंघाटे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम म्हणाले, या मार्गावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे बारीक निरीक्षण करण्यात येईल. यासाठी २५-२० खेळाडूंसह आम्ही पूर्वीपासून तयारीला सुरुवात केली होती. या स्पर्धेत भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे. राष्ट्रीय स्पर्धेत पुरुष आणि महिला गटासाठी अनुक्रमे २००० आणि ५०० मीटरपेक्षा अधिक अंतराच्या स्पर्धा होणार आहेत.
पुरुष विभागासाठी सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस दुहेरी, कॉक्सलेस फोर्स, (सर्व २००० आणि ५०० मीटरमध्ये) या स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे. खुल्या डबल स्कल्स आणि कॉक्सलेस फोर्स आणि कॉक्स एट या स्पर्धा फक्त २००० मीटर प्रकारात होईल. महिलांसाठी सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस दुहेरी, कॉक्सलेस फोर्स (२००० मीटर, ५०० मीटर), दुहेरी स्कल्स स्पर्धा (५०० मीटर) आणि पॅरा पुरुष सिंगल स्कल्स (२०० मीटर, ५०० मीटर) या स्पर्धा देखिल आयोजित केल्या जातील.
सीएमईमध्ये २००९ मध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर चौथ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वप्रथम २०१४ मध्ये राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यानंतर २०१८ मध्ये ३७व्या आणि २०१९ मधये ३९व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक पुरस्कार दिला आहे. (Senior Group National Rowing Championship from February 22 in Pune)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताकडून काहीतरी शिका…’, माजी कर्णधाराच्या मते ऑस्ट्रेलियाने केल्या ‘या’ पाच चुका
अश्विनच्या या कृत्यामुळे मोठमोठ्याने हसू लागला विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रिएक्शनही पाहण्यासारखी