Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

19 वर्षाखालील मुलींच्या टी-20 लीग संघाच्या निवड चाचणी प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी -स्वप्नील मोडक

19 वर्षाखालील मुलींच्या टी-20 लीग संघाच्या निवड चाचणी प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी -स्वप्नील मोडक

October 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
file photo

file photo


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान यांनी टी-20 लीग सामन्यासाठी निवड करताना पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप पुणे वारीयर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक स्वप्नील मोडक यांनी केला आहे. पुणे वारीयर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे स्वप्नील मोडक यांनी अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये मुला -मुलींना प्रशिक्षण देऊन खेळाडूंची प्रतिभा ओळखून मुलांना राष्ट्रीय व राज्यस्तरावर मार्गदर्शन केले आहे. 19 वर्षांच्या मुलींसाठी टी -20 लीगसाठी निमंत्रण सामने घेऊन नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली.

परंतु, निमंत्रण सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना डावलून दुसऱ्याच खेळाडूंना संधी देण्यात आली. ज्या खेळाडूंनी निमंत्रण सामना किंवा शिबिरात भाग घेतला नाही, तरी देखील रियाझ बागवान (Riaz Bagwan) यांच्या सांगण्यावरून त्यांची निवड करण्यात आली. कोणत्याही सामन्यांचे स्कोर कार्ड ऑनलाइन दाखविले गेले नाही. रियाझ बागवान यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगला खेळ करणाऱ्या गुणवंत खेळाडूंना वगळण्यात आल्याचा स्पष्ट आरोप स्वप्नील मोडक यांनी केला आहे. 19 वर्षाखालील मुलींच्या टी -20 लीग संघाची निवड चाचणीतील प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून रियाझ बागवान यांच्यावर कारवाई करावी, अशी देखील मागणी स्वप्नील मोडक यांनी बीसीसीआय चे सचिव जय शहा यांना पत्राद्वारे केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: मुंबईचा धसमुसळ्या खेळाने मानहानीकारक पराभव; जयपूरने उडवली टायटन्सची दाणादाण
दमदार इंग्लंडची विश्वचषकात विजयी सलामी; अफगाणिस्तानची झुंज अपयशी 


Next Post
Jos-Buttler

त्याने झेपही घेतली अन् तो पडलाही, पण कॅच मात्र सोडला नाही, पाहा बटलरचा अविश्वसनीय झेल

Yuvraj Singh

टी-20 क्रिकेटमध्ये 12 चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज, युवराजचे नाव पहिल्या क्रमांकावर

Jos-Buttler-On-Afghanistan-Defeat

'त्यांनी चांगली गोलंदाजी केली', अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143