ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचे म्हणणे आहे की, एॅडलेड मध्ये झालेल्या निराशाजनक पराभवामुळे भारतीय संघाचे गंभीर घाव पुन्हा ताजे झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे या मालिकेत क्लीनस्विप करण्याची मोठी संधी आहे. भारतीय संघ गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 36 धावांवर गडगडला होता.
ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 1-0 ने आघाडी घेतली. पॉन्टिंग म्हणाला, “आता काही गंभीर घाव ताजे झाले आहेत. ही संधी क्लीनस्विप करण्यासाठी योग्य ठरू शकते. मेलबर्न मध्ये सकारात्मक परिणामाची आशा ठेवा आणि जर आपण हे करू शकलो तर भारतीय संघाला वापसी करण्यासाठी एक सामना जिंकणे अवघड होईल.”
भारताला उर्वरित तीन सामन्यात कर्णधार विराट कोहलीची उणीव भासेल. जो आपल्या पालकत्व रजेवर मायदेशी परतेल. पॉन्टिंग म्हणाला, “ही पाहुण्या संघाची खरी परीक्षा असेल. ज्यामुळे त्यांना अजिंक्यच्या नेतृत्वाखाली पुनरागमन करावे लागेल. आम्हाला त्यांच्याबद्दल खुप काही समजेल. कोहली च्या अनुपस्थित त्यांच्याकडे असा कोणी नाही, जो अशा प्रकारच्या पराभवानंतर वापसी करून देईल.”
भारताला 26 डिसेंबर पासून सुरू होणार्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी योग्य प्लेईंग इलेव्हनची निवड करावी लागेल. कारण पहिल्या सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शाॅ आणि यष्टिरक्षक रिद्धीमान साहा अपयशी ठरले आहेत. रिषभ पंत आणि शुभमन गिल यांना संधी दिली जावे असे पॉन्टिंगचे मत आहे.
भारतीय संघाने एॅडलेड मध्ये सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे गुडघे टेकले होते. पॉन्टिंग म्हणाले, “भारत दोन बदल करू शकतो. मधल्या फळीत रिषभने असायला हवे. कोहली च्या अनुपस्थित फलंदाजी मजबूत करायला हवी.”
भारतीय संघाला दुसर्या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थित विजय मिळविणे गरजेचा आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि उर्वरित कसोटी मालिकेसाठीचा कर्णधार अजिंक्य रहाणेसमोर मेलबर्न येथे होणार्या सामन्यात दोन आव्हाने असणार आहेत. एक स्वतःला सिद्ध करणे आणि संघाला विजय प्राप्त करून देणे. त्यामुळे या सामन्यात अजिंक्य रहाणे काय करतो, याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
संबधित बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; या धाकड फलंदाजाचे मेलबर्नमध्ये आगमन
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात हे ५ बदल
– दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले गोलंदाजांचे कौतुक, म्हणाला