वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) चौथा टी20 सामना स्काय स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात भारताने या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली.
मागील 6 महिन्यातील न्यूझीलंडची ही सुपर ओव्हरनंतर पराभूत होण्याची तब्बल चौथी वेळ आहे. तर भारताविरुद्धच्या चालू टी20 मालिकेत सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये पराभव स्विकारला आहे. या टी20 मालिकेत तिसऱ्या सामन्यातही बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे न्यूझीलंडने मागील 3 महिन्यात खेळलेल्या 6 टी20 सामन्यांपैकी 3 टी20 सामने सुपर ओव्हरमध्ये गमावले आहेत. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेआधी 10 नोव्हेंबर 2019 ला ऑकलंड येथे न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्ध टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव स्विकारला होता.
एकूण सुपर ओव्हरच्या इतिहासाचा विचार करता न्यूझीलंडने आत्तापर्यंत 8 सामन्यात सुपर ओव्हर खेळल्या आहेत. यातील 7 सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुपर ओव्हर खेळणारा संघ आहे.
न्यूझीलंडने सुपर ओव्हर खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 1 वनडे तर 7 टी20 सामन्यांचा समावेश आहे. हा एक वनडे सामना त्यांनी 2019 विश्वचषकात खेळला. त्यांना 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 14 जूलैला इंग्लंड विरुद्ध सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
तसेच आत्तापर्यंत टी20मध्ये न्यूझीलंडने सुपर ओव्हर खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यांनी हा एकमेव विजय क्राईस्टचर्च येथे 2010मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात मिळवला आहे.
न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर –
विरुद्ध वेस्ट इंडिज – टी20, ऑकलंड, 2008 (पराभव)
विरुद्ध ऑस्ट्रेलिया – टी20, क्राईस्टचर्च, 2010 (विजय)
विरुद्ध श्रीलंका – टी20, पाल्लेकेले, 2012 (पराभव)
विरुद्ध वेस्ट इंडिज – टी20, पाल्लेकेले, 2012 (पराभव)
विरुद्ध इंग्लंड – वनडे, लॉर्ड्स, 2019 (पराभव)
विरुद्ध इंग्लंड – टी20, ऑकलंड, 2019 (पराभव)
विरुद्ध भारत – टी20, हॅमिल्टन, 2020 (पराभव)
विरुद्ध भारत – टी20, वेलिंग्टन, 2020 (पराभव)
Seven losses in eight for New Zealand now ????#NZvIND https://t.co/kt53TtxZP8 pic.twitter.com/dBLMk0rIPj
— ICC (@ICC) January 31, 2020
चौथ्या टी२०तही भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर
वाचा- ????https://t.co/8OFEwvxWUl????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020
या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना टी२०मध्ये दिलाय त्रास
वाचा????https://t.co/uw8fN2xAza????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020