भारताचा फिरकी गोलंदाज शादाब जकातीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 39 वर्षीय जकातीने ट्विटरवरुन त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.
गोव्याकडून खेळणाऱ्या जकातीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेवटचा टी20 सामना मागीलवर्षी आंध्रप्रदेश विरुद्ध खेळला आहे. तसेच 1998 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणाऱ्या जकातीने शेवटचा प्रथम श्रेणी सामना ऑक्टोबर 2017 मध्ये पंजाबविरुद्ध खेळला होता.
Just announced my retirement from all forms of cricket,Even though I have not been playing much over the last 1 year,it has been One of the harder things I have done in my life.Thank you @BCCI @goacricket11 with sincere gratitude 4 making me live my dream for the last 23 years pic.twitter.com/AoIvsS8IOO
— Shadab Jakati (@jakati27) December 27, 2019
त्याने आत्तापर्यंत 92 प्रथम श्रेणी सामने खेळताना 275 विकेट्स घेतल्या आहेत आणि 1 शतक आणि 14 अर्धशतकांसह 2734 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त, जकातीने अ दर्जाच्या 82 सामन्यांमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत आणि 1104 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
मात्र त्याला कधीही त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.
तथापि, त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
जकातीने आयपीएलमधील 59 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 47 विकेट्स घेतल्या आहेत. 22 धावांत 4 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील गोलंदाजीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
"सौरव गांगुलीने ४० मिनिटांत माझे मन जिंकले"
वाचा- ????https://t.co/G1joBdfC1A????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 27, 2019
शिखर धवनचे शानदार पुनरागमन; रणजी ट्रॉफीमध्ये या संघाविरूद्ध ठोकले शतक
वाचा- ????https://t.co/Us5Cmw2tqR????#म #मराठी #Cricket #shikhardhawan @Mazi_Marathi@MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 27, 2019