भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जात आहे. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळल्या गेलेल्या या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाकडून बंगालचा अष्टपैलू शाहबाझ अहमदने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने बळी मिळवला. त्यावेळी त्याने केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या शाहबाझला मागील दोन मालिकांमध्ये भारतीय संघात समाविष्ट केले गेले होते. मात्र, तेव्हा त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो पदार्पण करेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला तेव्हा अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नव्हती. रांची येथे कर्णधार शिखर धवनने त्याला कॅप दिली. यासह तो भारताचा 247 वा वनडे खेळाडू बनला.
That First Wicket Feeling! 🙌 🙌
Here's how debutant Shahbaz Ahmed scalped his maiden wicket in international cricket 🎥 🔽 #TeamIndia | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKiAHZ
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/Rq9vRyEWCo
— BCCI (@BCCI) October 9, 2022
आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला कर्णधाराने सहाव्या षटकात गोलंदाजीला आणले. पहिली दोन षटके त्याने किफायतशीर टाकली. तिसरे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर पाचव्या चेंडूवर जानेमन मलानला पायचित केले. पॅडवर चेंडू लागल्यावर मैदानी पंचांनी सुरुवातीला मलानला नाबाद ठरविले. परंतु, शाहबाझ व कर्णधार शिखर धवनने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यावेळी पंचांनी त्याला बाद घोषित केले. हा बळी मिळवल्यानंतर त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याने आपल्या पहिल्या सामन्यात 10 षटके टाकताना 54 धावा देत एक बळी मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ