आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे दरमहा क्रिकेटच्या तीनही प्रकारात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार दिला जातो. अशातच जुलै महिन्याचा महिला आणि पुरुष ‘प्लेअर ऑफ ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
आयसीसीने जुलै महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा केली आहे. हा पुरस्कार पुरुष गटातून बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी शकीब अल हसनसह ऑस्ट्रेलियन संघाचा मिचेल मार्श आणि वेस्टइंडिज संघाचा हेडन वॉल्श यांना नामांकन मिळाले होते.
तर महिला गटामध्ये वेस्टइंडिज संघाची स्टेफनी टेलर हीने ‘प्लेअर ऑफ ऑफ द मंथ’ चा पुरस्कार पटकावला आहे. या महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी वेस्टइंडिज संघाची क्रिकेटपटू हेले मॅथ्यूज आणि पाकिस्तान संघाची फातिमा सना यांना नामांकन मिळाले होते.
बांगलादेश संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात बांगलादेश संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. बांगलादेश संघाने गेल्या महिन्यात झिम्बाब्वे संघाला पराभूत केले होते. या दौऱ्यावर शकीब अल हसनने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली होती.(Shakib Al Hasan and Stefanie Taylor won player of the month award)
तसेच नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शकीब अल हसनने ४ गडी बाद केले होते. यासह त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. असा कारनामा करणारा तो लसिथ मलिंगा नंतर दुसरा गोलंदाज ठरला होता.
शकीब अल हसनने हा कारनामा आपल्या ८४ व्या टी -२० सामन्यात केला होता. त्याने आतापर्यंत एकूण टी -२० क्रिकेटमध्ये १०२ गडी बाद केले आहेत. या दरम्यान २० धावा खर्च करून ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह त्याने फलंदाजी करताना १७१८ धावा देखील केल्या आहेत. तसेच त्याने एकूण ३३६ टी -२० सामन्यात ३८१ गडी बाद केले आहेत.
तर स्टेफनी टेलर हीने देखील फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात वेस्टइंडिज संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.वेस्टइंडिज संघाने आपली शेवटची वनडे आणि टी-२० मालिका जुलै महिन्यात खेळली होती. तिने जुलैमध्ये वनडे मालिकेतील ४ सामन्यात स्टेफनी टेलरने १७५ धावा केल्या होत्या. तर ३.७२ च्या एकोनॉमीने तिने ३ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“खेळाडूंच्या मेहनतीवर टीका करू नये,” कर्णधार जो रुटचा आपल्या खेळाडूंना पाठिंबा
चिन्ना थाला इज बॅक! धोनी पाठोपाठ रैनाही चेन्नईत दाखल, जाणून घ्या केव्हा होणार युएईला रवाना