खूपवेळा क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे एखाद्या खेळाडूचे नाव खराब झाले आहे. त्या खेळाडूच्या या वागणुकीमुळे लोकं नेहमी त्या खेळाडूवर टीका करत असतात. अशावेळी अनेकदा त्या खेळाडूचे कुटुंबिय त्याच्याबरोबर उभे राहिल्याचे पाहण्यात येते. असाच एक किस्सा नुकताच पाहण्यात आला. तो म्हणजे बांग्लादेशचा खेळाडू शाकीब अल हसनला त्याच्या पत्नीने पाठिंबा दिला आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याने शुक्रवारी ढाका प्रिमीअर लीग दरम्यान पंचांच्या नाबाद निर्णयाविरुद्ध शकीब नाराजी व्यक्त केल. यावेळी त्याने लाथ मारून यष्टी उडवून टाकल्या. तसेच त्याने मैदानवर उपस्थित पंचाबरोबरही बाचाबाची केली.
मोहम्मदेन स्पोर्टिंगकडून खेळणाऱ्या अबाहनी लिमिटेड विरुद्ध झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात अबाहनीकडून फलंदाजी करणाऱ्या मुशफिकुर रहीमविरुद्ध शाकिबने त्याच्या चेंडूवर पायचीतसाठी अपील केले होते. पण रहीमला पंचानी नाबाद घोषित दिल्यामुळे शाकीब संतापला. शाकीबच्या या कृतीवर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे.
दरम्यान, शाकीबची पत्नी उम्मी अहमद शिशिर हिने मौन तोडले असून आपल्या पतीच्या बाजूने बोलताना तिने आपल्या फेसबुक पेज वर लिहिल की, “मी या घटनेचा तेवढाच आनंद घेत आहे जेवढा आनंद तुम्ही घेत आहात. टीव्हीवरच्या बातम्या बघून काही लोकांनी त्याला आधार दिला हे बघून बरे वाटले, ज्यांनी या घटनेचा खरा चेहरा पहिला. कमीत कमी कोणामध्ये तरी हिम्मत आहे, जो या गोष्टीच्या विरोधात उभा आहे. तसेच काही ठिकाणी मुख्य मुद्यांवर पडदा टाकला जात आहे. केवळ त्याने जे कृत्य केले तेच दाखविले जात आहे.”
सर्व घटनेनंतर शकीब अल हसनने आपल्या फेसबुक पेजवरून चाहत्यांची माफी मागितली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “प्रिय क्रिकेटप्रेमी आणि दर्शकहो, आज जे कृत्य केलं आणि तुमच्या भावनांना ठेच पोहोचली त्याबद्दल मी सगळ्यांकडून माफी मागू इच्छितो. माझ्यासारख्या अनुभवी क्रिकेटरकडून असे कृत्य होणे शोभा देत नाही. परंतु, कधी कधी तणावपूर्ण सामन्यात अशी गोष्ट होऊन जाते. मी सगळे संघ, तसेच स्पर्धेचे आयोजक आणि अधिकारी या सर्वांची मी माफी मागतो. मला अशा आहे अश्या प्रकारचे कृत्य माझ्याकडून पुन्हा होणार नाही. सगळ्यांना प्रेम.”
तिने पुढे म्हटले, ‘मुख्य मुद्दा पंचांचा आहे. मला वाटते की शाकिबविरुद्ध ही योजना आहे. त्याला मागील काही काळापासून खलनायकाच्या रुपात दाखवले जात आहे.’
शाकिबवर या कृत्याबद्दल कारवाई झाली असून त्याला ३ सामन्यांची बंदी आणि बांगलादेशी टाकानुसार ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! युरो २०२० स्पर्धेतील सामना सुरु असताना अचानक कोसळला ‘ख्रिस्टीयन एरिक्सन’, पाहा व्हिडिओ
रिषभचा धडाका कायम! पंतचे सराव सामन्यात शानदार शतक; गिल-इशांतची लक्षवेधी कामगिरी
काय सांगता? शून्यावर बाद होऊनही ‘या’ खेळाडूला प्रेक्षकांनी दिली होती मानवंदना