नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. यांनतर शाकिबने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी फिट राहण्यासाठी शाकिबने हा निर्णय घेतला आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्या या निर्णयाला परवानगी देखील दिली आहे.
कसोटी मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाकिब श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मात्र उपलब्ध असण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या फिटनेसवर हा निर्णय अवलंबून असेल. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष यांनी या वृत्ताला पुष्टी देताना शाकिबच्या विश्रांतीच्या निर्णयाला मंजुरी दिली असल्याचे सांगितले आहे.
शाकिबच्या निर्णयाबाबत बोलताना अक्रम म्हणाले, “शाकिबने आम्हाला नुकतेच एक पत्र पाठवले होते. ज्यात त्याने आयपीएल खेळण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन विश्रांतीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. कारण जर कोणी खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळण्यास इच्छुक नसेल, तर त्याच्यावर दबाव टाकण्यात काहीच अर्थ नाही.”
गुरवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३.२ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. यापूर्वी २०११ ते २०१७ या काळात शाकिब कोलकाता संघासाठी खेळला होता. त्यांनतर सनरायझर्स हैद्राबाद संघाने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. मागील हंगामात आयसीसीने घातलेल्या बंदीमुळे तो खेळू शकला नव्हता. मात्र येत्या हंगामात कोलकाताच्या संघाकडून तो पुनरागमन करेल.
महत्वाच्या बातम्या:
गोष्ट मॉरिसवर लागलेल्या १६.२५ कोटींच्या ऐतिहासिक बोलीची
पण इतिहास चुकीचा होता, खास संदेशासह सेहवागने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा