शुक्रवारी (०४ मार्च) ‘फिरकीचा जादूगार’ शेन वॉर्न (Shane Warne) याचा आकस्मिक मृत्यू (Shane Warne Died) झाला. तो ५२ वर्षांचा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या वॉर्नने हृद्यविकाराच्या झटक्याने (Shane Warne Died Of Heart Attack) जगाला अलविदा केला. वॉर्न मृत्यूवेळी थायलँडमधील कोह सामुईमध्ये होता आणि त्याच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याच्या या आकस्मित निधनानंतर त्याची तिन्ही मुले शोकसागरात बुडाली आहे. वॉर्नचे मॅनेजर जेम्स एर्स्किन यांनी याबाबत माहिती दिली.
मुलांना बसला मानसिक धक्का
वॉर्नच्या अकाली निधनानंतर त्याच्या तिन्ही मुलांना जोरदार मानसिक धक्का बसल्याचे जेम्स यांनी सांगितले. मुलांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. त्याच्या मुली ब्रुक आणि समर तसेच मुलगा जॅक्सन सातत्याने रडत असल्याचे जेम्स यांनी सांगितले. इतर कुटुंबीय त्यांना सावरत असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले.
घरातच आला हृदयविकाराचा झटका
वॉर्न एकटाच थायलंड येथे सुट्टी घालवण्यासाठी आला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा आनंद घेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. तो निपचित पडला होता. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत, त्याने आपला जीव गमावला होता.
‘शेन वॉर्न अटॅक आल्याने घरामध्येच पडला होता. वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने त्याच्यावर घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉर्नने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचार्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.’ असे त्याच्या व्यवस्थापकाकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.
शानदार राहिली कारकीर्द
वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ७०८ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामने खेळले आणि यामध्ये २९४ विकेट्स घेतल्या. आयपीएल जिंकणारा पहिला कर्णधार म्हणून देखील त्याची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या-
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा (mahasports.in)