नवी दिल्ली । वेगवान गोलंदाज शेन वॉर्नचा समावेश ऑस्ट्रेलियाच्या त्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये होतो, ज्यांचे आयुष्य विवादांनी भरलेले आहे. याचा प्रत्यय त्याच्या मैदानातील कृत्यांमुळे तर कधी त्याच्या गर्लफ्रेंडमुळे येतो. वॉर्नचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे. परंतु असे असले तरी त्याचे ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेबरोबर खूप वर्षांपर्यंत प्रेम संबंध होते. त्याच कारणामुळे ब्रेकअपच्या ७ वर्षांनंतरही त्याला तिची आठवण येते.
साखरपुड्यानंतर झाले होते वेगळे-
वॉर्न (Shane Warne) आणि एलिझाबेथचे (Elizabeth Hurley) अफेअर २०१०मध्ये सुरु झाले होते. वॉर्नने आपले नाते सर्वांसमोर मान्य केले होते. एका वर्षापर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०११मध्ये साखरपुडा केला होता. तरीही २ वर्षांनंतर ते दोघेही वेगळे झाले होते. वॉर्नने फॉक्स टी.व्ही. चॅनेलच्या एका कार्यक्रमात आपल्या गर्लफ्रेंडबद्दल चर्चा केली. त्यावेळी तो म्हणाला की, तो ब्रेकअपमुळे आजही दु:खी आहे. तसेच एलिझाबेथची काळजी करत असतो.
यावर स्पष्टीकरण देत त्याने म्हटले की, “मला आजही माझ्या ब्रेकअपबद्दल खूप दु:ख होते. ती खूप चांगली मुलगी आहे. ती जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये आली होती, तेव्हा आम्ही एकमेकांच्या खूप जवळ नव्हतो. त्यामुळे मी तिला आपल्या मुलांशी भेटवले नाही. परंतु जेव्हा मला वाटले की, आम्ही नात्याबद्दल खूप गंभीर आहोत, तेव्हा मी तिला मुलांशी भेटवले होते.”
पहिल्या बायकोला धोका दिल्याची खंत-
वॉर्नने पुढे सांगितले की, त्याला पत्नी सिमोन कॉलाहनला (Simone Callahan) धोका देण्याची खंत आहे. दोघांचे लग्न १९९५मध्ये झाले होते. त्यानंतर ते २००५ मध्ये वेगळे झाले होते. त्या दोघांनाही ३ मुले होते.
वॉर्नने ज्या मुलीसाठी सिमोनला धोका दिला, तिच्याबरोबरसुद्धा लवकरच संबंध तोडले होते. हे नाते संपविल्यानंतर त्याच्या आयुष्यात एलिझाबेथ आली होती. सेक्स स्कँडलमुळे त्याचे पहिले लग्नदेखील तुटले आहे. इतकेच नव्हे तर वॉर्नला ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधार पदही गमवावे लागले होते.
वॉर्नचा २००० मध्ये एका ब्रिटीश नर्सबरोबरच्या बेकायदेशीर संबंधाचा खुलासा झाला होता. त्यानंतर त्याचा पत्नी सिमोनबरोबर घटस्फोट झाला होता. यानंतर वॉर्नचा २ मुलींबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो केवळ अंतर्वस्त्रावर दिसत होता.
त्याने २००५मध्ये एका ३ मुलांची आई असणाऱ्या महिलेबरोबर बेकायदेशीर नाते असल्याचेही सांगितले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज
-थेट विश्वचषकातूनच टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणारे भारतीय खेळाडू
-आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, वेळही जवळपास ठरल्यात जमा