विशाखापट्टणम। शुक्रवारी(10 मे) आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात क्वाॅलिफायर 2 चा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवून 8 व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
चेन्नईच्या या विजयात सलामीवीर फलंदाज फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. पण या सामन्यात चेन्नईकडून डुप्लेसिस आणि वॉटसन दिल्लीने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरले असताना सुरुवातीलाच मैदानात एक मजेदार घटना घडली.
झाले असे की चेन्नईकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी डुप्लेसिस आणि वॉटसन आले. यावेळी पहिल्या षटकात दिल्लीकडून ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. त्याने पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकले. पण तिसऱ्या चेंडूवर डुप्लेसिसने पॉइंटला फटका खेळला आणि तो चोरटी एकेरी धाव घेण्यासाठी धावला. यावेळी वॉटसनही नॉन स्ट्रायकर एन्डवरुन धावला.
मात्र ही धाव पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच डुप्लेसिस वळाला पण वॉटसन पुढे आला असल्याचे पाहून त्याने ती धाव पूर्ण करण्यासाठी परत नॉन स्ट्रायकर एन्डला धावायला सुरुवात केली. परंतू त्याचवेळी वॉटसनही परत फिरला ते बघून पुन्हा डुप्लेसिस वळाला. यावेळी एवढा गोंधळ झाला की एकवेळ हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधे अडकले होते.
याचवेळी दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांकडूनही गोंधळ झाला. त्यामुळे त्यांनी वॉटसन आणि डुप्लेसिसला धावबाद करण्याच्या संधी गमावल्या. डुप्लेसिसने पॉइंटला फटका मारल्यानंतर तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलने चेंडू अडवला आणि नॉन स्ट्रायकर एन्डच्या दिशेने फेकला. त्यावेळी कॉलिन मुनराने चेंडू पकडला आणि स्टम्पवर मारण्याऐवजी यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला.
तो चेंडू पकडण्यासाठी रिषभ पंतने उडी मारली पण त्याच्यामधे बोल्ट आल्याने तो चेंडू फाईन लेगच्या दिशेला गेला. त्यामुळे नंतर वॉटसन आणि डुप्लेसिसने हा चेंडू फाईन लेगला गेल्याचे पाहून एक धावही काढली.
या घटनेचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘पहिल्या षटकातील गोंधळ’
WATCH: The 1st over confusion galore ????????
Full video here ????????https://t.co/g4EtxfzHj1 #CSKvDC pic.twitter.com/nWEdZkJ0a1
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2019
या गोंधळानंतर मात्र डुप्लेसिस आणि वॉटसनने चांगला खेळ करताना अर्धशतकी खेळी केल्या. डुप्लेसिसने 39 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच वॉटसनने 32 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.
या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचत चेन्नईला विजयाचा पाया रचून दिला. त्यामुळे चेन्नईने 19 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावांचे आव्हान सहज पार केले. दिल्लीकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 147 धावा केल्या. दिल्लीकडून रिषभ पंतने सर्वाधिक 38 धावा केल्या. प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईकडून दिपक चहर, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर इम्रान ताहिरने 1 विकेट घेतली.
आता रविवारी(12 मे) आयपीएल 2019 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
???????????? #DCvCSK https://t.co/yy60wR0Q2L
— காளி #Thunivu (@Noirmpm) May 10, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इशांत शर्माने तब्बल १० वर्षांनंतर मारला टी२०मध्ये षटकार, पहा व्हिडिओ
–आत्तापर्यंत या संघांनी खेळले आहेत आयपीएलचे अंतिम सामने
–आयपीएलमध्ये हरभजन सिंगचा मोठा पराक्रम, या खास यादीत झाला समावेश