भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर पडले आहेत. शरण आणि त्याचा ब्रिटिश जोडीदार ल्यूक बॅमब्रिजला ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेते मॅक्स प्युरसेल व ल्यूक सव्हिल या जो़डीकडून उपांत्यपूर्व फेरीत 3-6, 5-7 असा पराभव स्विकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनला पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत फिनलंडच्या एमील रुसुव्वुरीने 6-2, 3-6 आणि 6-4ने पराभूत केले. यासह एमीलने पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फ्रान्सच्या अॅड्रियन मन्नारिनो आणि अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅक्डोनाल्ड यांनीही पुरुषांच्या एकेरी गटातील शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले आहे.