टोकियो ऑलिंपिक 2020मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) भारतीय संघाची धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे. सकाळी पार पडलेल्या पुरुष तिरंदाजीत भारतीय संघाने आपल्या दमदार कामगिरीने कझाखस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर फेन्सिंग प्रकारातही भवानी देवीने पहिल्याच सामन्यात विजयी सुरुवात केली. अशातच आता आणखी एक चांगली बातमी येतेय, ती म्हणजे टेबल टेनिसमध्येही भारताच्या पठ्ठ्याने विजय मिळवला आहे.
भारत आणि पोर्तुगाल संघात टेबल टेनिसचा दुसऱ्या राऊंडचा सामना पार पडला. यात भारताच्या शरथ कमलने जागतिक क्रमवारीत ५९ व्या क्रमांकावर असणाऱ्या पोर्तुगालच्या टियागो अपोलोनियाला ४-२ ने पराभूत केले आहे. (Sharath Kamal Beats Tiago Apolonia 4-2 In 2nd Round)
#TableTennis :
Sharath Kamal moves into 3rd round with 4-2 win over Tiago Apolonia (WR 59).
Next he will face ???? Ma Long, the reigning Olympic & defending Champion, for a place in Pre-QF. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/lEsaFaMsnV— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
दरम्यान शरथने अपोलोनिया २-११, ११-८, ११-५, ९-११, ११-६, ११-९ अशी मात दिली. यासोबतच शरथला उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मंगळवारी (२७ जुलै) चीनच्या मा लाँगचा सामना करावा लागणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-भारीच ना! फेन्सिंग प्रकारात भवानी देवीची दमदार सुरुवात; ट्युनिशियाच्या नादियाला १५-३ ने चारली धूळ