भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा आणि राष्ट्रीय वेटलिफ्लिंगचे प्रशिक्षक विजय सिंग यांची यावर्षीच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच यामध्ये भारतीय टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमलचे वडील श्रीनिवास राव यांचाही समावेश आहे.
विजय सिंग यांनी वर्ल्ड चॅम्पियन मिराबाई चानू आणि २०१८राष्ट्रकूल स्पर्धा सुवर्णपदक विजेती संजिथा चानू यांना प्रशिक्षण दिले आहे. तर तारक यांचा शिष्य असलेल्या पंतने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटीत शतक झळकावले आहे.
तारक यांचे दिल्लीत सोनेट क्रिकेट क्लब आहे. यामधून त्यांनी आकाश चोप्रा, अतुल वसन, अंजुम चोप्रा, शिखर धवन, आशिष नेहरा, पंत या भारतीय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे.
तसेच १९८५-८६ची रणजी ट्रॉफी दिल्लीने तारक यांच्याच मार्गदर्शनाखाली जिंकली आहे. २००१-०२ या हंगामात त्यांनी महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली आहे. याच दरम्यान मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी संघात पदार्पण केले होते.
या पुरस्काराच्या शिफारसीमध्ये टेबल टेनिस स्टार मनिका बात्राचे प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि पिस्टलचे प्रशिक्षक जसपाल राणा या दोघांचाही समावेश नाही. राणा यांनी कुमार गटाला एशियन गेम्स आणि शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सराव दिला आहे.
पुरस्काच्या शिफारसी:
द्रोणाचार्य- तारक सिन्हा (क्रिकेट), क्लॅरेन्स रोबो (हॉकी), विजय शर्मा (वेटलिफ्लिंग), जीवन शर्मा (ज्युदो), सीए कुटप्पा (बॉक्सिंग) आणि श्रीनिवास राव (टेबल टेनिस)
ध्यान चंद- भारत छेत्री (हॉकी), सत्यदेव (तिंरदाजी), दादू चौगुले (कुस्ती) आणि बॉबी एल्योसियस (अॅथलेटिक्स)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग
–विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस, बनणार केवळ तिसरा क्रिकेटर
–एम एस धोनीने शास्त्रींच्या अनुपस्थितीत खेळाडूंना दिला कानमंत्र