दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना पार्लच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज संघाला दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. भारतीय संघाकडून शिखर धवनने (Shikhar Dhawan) सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकूर याच्या (Shardul Thakur) नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २९७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या २६५ धावा करता आल्या. भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, भारतीय संघातील खेळाडूंना शेवट गोड करता आला नाही. या सामन्यात शिखर धवन आणि विराट कोहलीसह शार्दुल ठाकूरने देखील तुफानी अर्धशतक झळकावले.
तसेच तो दक्षिण आफ्रिकेत ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणारा आणि अर्धशतक झळकावणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जोहान्सबर्ग येथे कसोटीत गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले होते.
शार्दुल ठाकूर हा भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतोय. यापूर्वी देखील अनेकदा त्याने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १ अर्धशतक, इंग्लंडमध्ये २ आणि दक्षिण आफ्रिकेत १ अर्धशतक झळकावले आहे.
अधिक वाचा – ‘…तेव्हा शार्दुल खूप रागावलेला’,सहकाऱ्याने सांगितली ‘ती’ आठवण
दक्षिण आफ्रिकेचा विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, रस्सी वॅन डर ड्यूसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले, तर तेंबा बावुमाने ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटक अखेर ४ बाद २९६ धावा करण्यात यश आले.
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ५१ धावांचे योगदान दिले. शेवटी शार्दुल ठाकूरने झुंज देत नाबाद ५१ धावांची खेळी केली. परंतु, त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला हा सामना ३१ धावांनी गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर
“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
हे नक्की पाहा :