Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतः च्याच हळदीत ‘लॉर्ड’ शार्दुल झाला झिंगाट! बेफाम डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

February 25, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Instagram/Manish More

Photo Courtesy: Instagram/Manish More


अवघ्या काही दिवसांच्या अंतरामध्ये भारतीय संघाचा तिसरा क्रिकेटपटू आता विवाहबंधनात अडकणार आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा सोमवारी (27 फेब्रुवारी) मुंबई येथे आपली मैत्रीण मिताली पारूळकर हिच्याशी लग्नगाठ बांधेल. त्याच्या लग्नानिमित्ताने आता त्याच्या घरी लग्नापूर्वीचे इतर सोपस्कार पार पडत आहेत.‌ नुकताच त्याचा हळदी समारंभ उरकला. या समारंभात स्वतः शार्दुल हा नाचताना दिसला.

शार्दुलने त्याची मैत्रीण मिताली पारूळकर हिच्याशी नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 2022 टी20 विश्वचषकानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे त्यावेळी हा विवाह होऊ शकला नव्हता. या जोडप्याला गोवा येथे डेस्टिनेशन वेडिंग करायचे होती. परंतु, काही अडचणींमुळे हे लग्न आता मुंबई जवळीलच एका ठिकाणी होणार असल्याचे समजते. स्वतः मितालीने एका मुलाखतीत ही माहिती दिली. या लग्नाला जवळचे 200-250 नातेवाईक व मित्र-मैत्रिणी उपस्थित राहणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manish more (@manish_drumming_)

 

तत्पूर्वी, शार्दुलच्या घरी हळदी समारंभ पार पडला. यामध्ये त्याच्या काही नातेवाईकांनी सहभाग घेतला. त्यावेळी तो प्रसिद्ध मराठी गाणे झिंगाट यावर डान्स करताना दिसला. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

शार्दुल सध्या भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. मात्र, वनडे संघात तो नियमितपणे दिसून येतो. या लग्न समारंभाला भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा संपत्नीक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे,  ‌‌ मिताली ही एक बेकर आहे. तसेच यापूर्वी ती काही कंपन्यांची सेक्रेटरी देखील राहिली होती. तिने काही काळ मॉडेलिंग देखील केली होती. आपल्या लग्नात ती स्वतः केक डिझाईन करणार असल्याचे माध्यमांतून समजत आहे.

(Shardul Thakur Dance On Zingat Song In His Marriage Rituals Haldi Ceremony)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीएवढे कसोटी षटकार माराणारा न्यूझीलंडचा गोलंदाज! इंग्लंडविरुद्ध खेळताना नावावर केला नवा विक्रम
‘धोनी माझा फोन 99% उचलणारच नाही’, विराटचा मोठा खुलासा


Next Post
Ricky Ponting Allan Border Pat Cummins

ऑस्ट्रेलियाच्या 'या' सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत

Photo Courtesy: Twitter

"ती काय जॉगिंग करत होती?" माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला 'हा' धडा

Sailing National Championships

पुनरागमनाच्या शर्यतीत दत्तू भोकनळ अंतिम फेरीत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143