भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर होता. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. तसेच इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने एकहाती झुंज दिली. परंतु तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला. त्याला शार्दुल ठाकूरने बाद करत माघारी धाडले.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता. कारण भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. एकापाठोपाठ एक फलंदाज माघारी परतले होते. परंतु कर्णधार जो रूटने एका बाजूने मोर्चा सांभाळून ठेवला होता.
जो रूट ६४ धावांवर फलंदाजी करत होता. तो पूर्णपणे सेट झाला होता आणि शतक झळकावण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. इतक्यात कर्णधार कोहलीने ५९ वे षटक टाकण्याची जबाबदारी शार्दुल ठाकूरला दिली. या षटकातील पहिल्याच चेंडूवर शार्दुलने ओवर द विकेटचा मारा करत सरळ चेंडू टाकला, जो टप्पा पडून आत आला आणि जो रूटची बॅट येईपर्यंत तो चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला.
यावर शार्दुलने पंचांकडे मागणी केली असता, पंचांनी त्याला बाद घोषित केले. हा चेंडू पाहून जो रूट देखील आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Shardul thakur’s unplayable ball to joe root, watch video)
India on a roll this afternoon.
Scorecard/C;lips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/OxCdKQnOP1
— England Cricket (@englandcricket) August 4, 2021
शार्दुल ठाकूरने ५९ व्या षटकात जो रूटला ६४ धावा करत आणि ऑली रॉबिंसनला भोपळाही न फोडता माघारी धाडले. तसेच जसप्रीत बुमराहने या डावात ४ गडी बाद केले; तर मोहम्मद शमीला ३ गडी आणि मोहम्मद सिराजला १ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीची बालिश चूक, बेयरस्टोला धावबाद करण्याची संधी असताना दुसऱ्याच बाजूला फेकला चेंडू
टीम इंडियाच्या तोफखान्याकडून इंग्लंडचा आख्खा संघ गारद! पाहा प्रत्येक विकेट्स
‘पंतने सॅम करनचे गॉगल चोरले?’ रिषभच्या ‘त्या’ गॉगल्सचीच सगळीकडे चर्चा