भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला २-१ ने मालिका जिंकवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शार्दुल ठाकूरला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या २ सामन्यात संधी देण्यात आली होती. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेल्या उमेश यादवच्या जागी संघात जागा देण्यात आली होती. मात्र उमेश यादव दुखापतीतून बरा होऊन संघात परतला आहे. त्यामुळे शार्दुलला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.
१० तास प्रवास करत पोहोचला सामना खेळायला
अशातच शार्दुल ठाकूरने भारतीय संघातून डच्चू दिल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळण्यासाठी चक्क अहमदाबाद ते जयपूर चा १० तासाचा प्रवास कार चालवत पूर्ण केला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहभागी असलेले संघ बायो बबलचे पालन करत आहेत. शार्दुलला विमानाने जयपूरला पोहोचायला अवघे ८० मिनिट लागले असते.
परंतु जयपूरला पोहोचल्यानंतर त्याला ३ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागले असते. यामुळे त्याला मुंबई संघासाठी पुढील सामना खेळता आला नसता. म्हणून त्याने कारने जाण्याचा निर्णय घेतला. अशात तब्बल १० तासास ७०० किलोमीटर अंतर कापत तो वेळेवर संघात सहभागी झाला.
फक्त क्रिकेट खेळण्यासाठी शार्दुलने विमान सोडून कारने जाण्याचा निर्णय घेत लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनेकांनी त्याच्या समर्पकतेबद्दल त्याची प्रशंसा केली आहे.
मुबंई संघाने केले कौतुक
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक शार्दुलचे कौतुक करत म्हणाले, “आमच्या हातात काहीच नव्हते, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. त्याने २२ तारखेला सकाळी ५ वाजेपासून प्रवास सुरू केला आणि संध्याकाळी जयपूरला पोहोचला. जर तो विमानाने आला असता तर त्याला क्वारंनटाईनमध्ये राहावे लागले असते.”
तिसऱ्या कसोटी सामण्याआधी भारतीय संघाने केले बाहेर
बॉर्डर गावसकर ट्रॉफी मध्ये दुखापतग्रस्त झालेल्या उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात संधी देण्यात आली होती. तसेच त्याची निवड इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात देखील झाली होती. परंतु त्याला खेळायची संधी मिळाली नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवचे पुनरागमन झाले. त्यामुळेच शार्दूलला बाहेर करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या परदेशी चाहतीने लुटला इंग्लंडच्या पराभवाचा आनंद, मग काय भिडले ट्विटरवॉर
गेलचे ‘सलवार चॅलेंज’ बघून हसू आवरणार नाही, पहा मजेशीर व्हिडीओ
अंपायरने नाबाद देऊनही घेतला रिव्ह्यू अन् पडले तोंडघशी; मग पंचाने मैदानावरच केला जल्लोष, पाहा व्हिडिओ