लुंगी एंगिडी आणि लुथो सिपामला यांनी दक्षिण आफ्रिका संघासाठी धारदार गोलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंका संघाचा दुसरा डाव २११ धावांवर आटोपला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाने दुसर्या कसोटीत तिसर्या दिवशी लंच ब्रेकनंतर 10 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. श्रीलंका संघाने दुसर्या कसोटी सामन्यात विजयायासाठी 67 धावांचे लक्ष दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका 13.2 षटकात 67 धावा करत विजय नोंदवला.
तत्पूर्वी लुंगी एंगिडीने 44 धावांत 4 आणि लुथो सिपामलाने 40 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे श्रीलंका संघाचा डाव कर्णधार डी करुणारत्नेच्या(103) शतकी योगदानानंतरही 56.5 षटकात गुंडाळला गेला. श्रीलंका संघाने पहिल्या डावात 157 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या पहिल्या डावात 302 धावा केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 145 धावांची आघाडी घेतली होती.
ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला या दोन सामन्यांच्या विजयानंतर 120 गुणांची कमाई करता आली. श्रीलंका संघाने 4 बाद 150 धावांवर तिसर्या दिवशी खेळायला सुरुवात केली होती. कर्णधार करुणारत्ने याने 91 धावांवरुन पुढे खेळताना एॅनरीच नॉर्टजे याच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकत 123 चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र श्रीलंका संघाचा कर्णधार करुणारत्ने त्यानंतर एॅनरीच नॉर्टजेच्या पुढील षटकात हवेत फटका मारून वियान मुल्डर याला झेल देवून बाद झाला.
करुणारत्ने याने 127 चेंडूचा सामना करताना 19 चौकार ठोकत 103 धावांची खेळी केली. त्यानंतर लुंगी एंगिडीने आपल्या पुढील षटकात यष्टीरक्षक डिक्वेला याला 36 धावांवर झेलबाद केले. त्यामुळे श्रीलंका संघाला सहावा झटका बसला. विल्डर याने दासून शनाका (8) तंबूत पाठवले. सिपामलाने वानिदू हसरंगा (16) दुष्मंत चमिरा (0) असिता फर्नांडोला बाद केल्यानंतर श्रीलंका संघाचा डाव संपला. श्रीलंका संघाने शेवटच्या 6 विकेट्स फक्त 35 धावात गमावल्या.
दक्षिण आफ्रिका संघाकडून दुसर्या डावात फलंदाजी करताना मार्क्रमने 53 चेंडूचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 36 धावा केल्या. त्याचबरोबर एल्गरने 27 चेंडूचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 13.2 षटकात 67 धावांचे लक्ष्य पार करताना 10 विकेट्सने विजय मिळवला. लुंगी एंगिडीने दक्षिण आफ्रिका संघाकडून 44 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले…
पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस…! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला
“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी