शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वात भारतीय महिलांचा 19 वर्षाखालील संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. याठिकाणी आयसीसीचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषक खेळला जात आहे. शनिवारी (14 जानेवारी) भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांचे 19 वर्षांखालील संघ आमने सामने होते. भारताने हा सामना 7 विकेट्सने नावावर करत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. कर्णधार शेफाली वर्माने वादळी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.
भारताला विजयासाठी आफ्रिकी महिला संघाने 167 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी श्वेता सेहरावत (Shweta Sehrawat) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) खेळपट्टीवर आल्या आणि त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. श्वेताने 57 चेंडूत 92 धावा कुटल्या, तर शेफालीने देखील कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. शेफालीने अवघ्या 16 चेंडूत 45 धावा कुटल्या. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 281.25 होता. 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने तिने या धावा केल्या.
भारताच्या डावातील सहावे शतक संघासाठी आणि शेफालीसाठी अप्रतिम ठरले. शेफालीने या षटकातील प्रत्येक चेंडू सीमारेषेपार लाठवला. या षटकात दक्षिण आफ्रिका संघाची वेगवान गोलंदाज नथाबिसेंग निनी (Nthabiseng Nini) गोलंदाजीला आली आणि यावेळी स्ट्राईकवर शेफाली होती. शेफालीने या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर लागोपाठ पाच षटकात ठोकले. शेवटच्या चेंडूवर शेफालीने समोरच्या दिशेने उत्कृष्ट षटकार मारला आणि या षटकात एकूण 26 धावा घेतल्या. या एका षटकाच्या जोरावर शेफालीचा स्ट्राईक रेट चांगलाच सुधारला. या षटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 16.3 षटकात हे लक्ष्य गाठले. भारताने 21 चेंडू शिल्लक असताना तीन बाद 170 धावा केल्या आणि सामना नावावर केला. (Shefali Verma, captain of the India Under-19 women’s team, hit five fours and a six in an over.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेफाली- श्वेताची झुंज यशस्वी, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 19 वर्षांखालील विश्वचषकात विजयी सुरुवात
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार