भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळायची आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर या दौऱ्यात संघासोबत आहेत. मंगळवारी (6 नोव्हेंबर) दोघांनी संघासोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, शिखर धवनचा वाढदिवस एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी (5 डिसेंबर) झाला असला, तरी तो मंगळवारी श्रेयससोबत केक कापताना दिसला.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघेही दिग्गज फलंदाज वाढदिवसाचा केक कापताना आणि एकमेकांना भरवताना दिसत आहेत. दरम्यान, धवन मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आला असून सोमवारी त्याचा 37 वा वाढदिवस होता. तर दुसरीकडे क्षेयस अय्यर याने मंगळवारी वयाची 28 वर्ष पूर्ण केली. या दोघांसाठी भारतीय संघाच्या आजी आणि माजी दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. क्रिकेटसह इतर क्षेत्रांमधील नामांकित व्यक्तींकडून देखील या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. चाहते बीसीसीआयच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
शिखर धवन मागच्या काही वर्षांमध्ये बारताच्या कसोटी आणि टी-20 संघातून बाहेर आहे. मात्र, एकदिवसीय संघात त्याला नियमित संधी मिळत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात धवन भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. परंतु संघाला त्याच्या नेतृत्वात मालिका गमवावी लागली. बांगलादेश दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले असून, धवन देखील संघात कामय आहे. धनव संघात असल्यामुळे नेहमी सलामीला येणार केएल राहुल मध्यक्रमात खेळताना दिसला. दुसरीकडे श्रेयस अय्यरने देखील न्यूझीलंड दौरा चांगलाच गाजवला. अय्यरने न्यूझीलंडसोबतच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 80 तर तिसऱ्या सामन्यात 49 धावांची खेळी केली होती.
Smiles on 😃
Here's wishing @SDhawan25 & @ShreyasIyer15 a very happy birthday.#TeamIndia pic.twitter.com/rfjHr9F9rZ
— BCCI (@BCCI) December 6, 2022
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत देखील या दोघांकडून चाहत्यांना चांगल्या खेळीच्या अपेक्षा आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनला 7, तर अय्यरला 24 धावांवर समाधान मानावे लागले. परिणामी संघ मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि बांगलादेशने चुरशीच्या सामन्यात एका विकेटने विजय मिळवला. (Shikhar Dhawan and Shreyas Iyer’s birthday cake was cut together during the Indian team’s tour of Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आर अश्विनची भविष्यवाणी! आयपीएल 2023 च्या लिलावात ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली
महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील