श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून देखील पदार्पण केले. तो भारताचा २५ वा वनडे कर्णधार बनला. याचसोबत त्याच्या नावे एक आगळावेगळा विक्रम देखील जमा झाला.
धवनच्या नावे जमा निराळा विक्रम
मागील बारा वर्षापासून भारतीय संघासाठी वनडे क्रिकेट खेळत असलेल्या शिखर धवन याला नियमित कर्णधार विराट कोहली व इतर अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. तब्बल १४२ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळल्यानंतर तो भारताचे नेतृत्व करतोय. याच बरोबर त्याच्या नावे एक निराळा विक्रम जमा झाला.
शिखर श्रीलंकेविरुद्ध नाणेफेकीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याचे वय ३५ वर्ष २२५ दिवस इतके होते. याचबरोबर तो भारताचे वनडेमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणारा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ३४ वर्ष ३७ दिवस इतके वय असताना भारताचे वनडेत पहिल्यांदा नेतृत्व केले होते.
या वेगळ्या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे सय्यद किरमाणी व अजित वाडेकर हे आहेत. त्यांनी अनुक्रमे ३३ वर्ष ३५३ दिवस व ३३ वर्ष १०३ इतके वय असताना प्रथमतः वनडे सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळले होते.
शिखरला सामना संस्मरणीय बनवण्याची संधी
एका नव्या जवाबदारीसह मैदानात उतरलेल्या शिखरला या सामन्यात २३ धावा बनवतात वनडे क्रिकेटमध्ये ६ हजार धावा बनवण्याची संधी आहे. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरेल. याशिवाय तो सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
सध्या वनडेत सर्वात जलद ६००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट (१३६ डाव) अव्वल क्रमांकावर आहे. तर गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीला ६००० वनडे धावा करण्यासाठी १४७ डाव लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा धोनी मित्र रैनाला म्हणाला होता, ‘तुम्ही मोठी माणसं आहात, मला पुन्हा बोलवू नकोस’
बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देईल, इतकी सुंदर आहे टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबेची पत्नी, पाहा फोटो
‘हा’ फलंदाज भरुन काढणार एबी डिवीलियर्सची जागा! अवघ्या ७ वनडेत ठोकलीत २ द्विशतके